इगतपुरीत ३५ गावांत 'टीव्हीवरची शाळा'; सहा हजार विद्यार्थ्यांना घरपोच शिक्षण 

school on tv in igatpuri
school on tv in igatpuri

नाशिक/इगतपुरी : कोरोनामुळे शाळा बंद होत्या आणि आता दिवाळीच्या सुट्या लागल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना घरातच शिक्षण मिळावे, या हेतूने पेहेचान प्रगती फाउंडेशन, मुंबई व इगतपुरी तालुका शिक्षक संघाच्या सहकार्याने तालुक्यातील ३५ शाळांत टीव्हीवरच्या शाळा हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. 

धामडकी पॅटर्न टीव्हीवरच्या शाळा

इगतपुरी तालुक्यात टीव्हीवरची शाळा याची सुरवात करणारे धामडकी शाळेचे शिक्षक प्रमोद परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संघातर्फे पिंपरी सद्रोद्दिनचे केबल ऑपरेटर अमजद पटेल यांचे सहकार्याने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. आज फाउंडेशनचे अनुज अजमेरा व शिखा अजमेरा यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. पंचायत समितीचे सदस्य सोमनाथ जोशी, विस्ताराधिकारी एन. डी. मोरे, शाहीर उत्तम गायकर उपस्थित होते. तालुक्यातील ३५ गावांमधील टीव्हीवरची शाळा पॅटर्न राबविण्यात येत आहे व त्याचा लाभ जिल्हा परिषद शाळेचे एकूण सहा हजार ५०० विद्यार्थी घेणार असून, खासगी शाळांचे विद्यार्थीही याचा लाभ घेऊ शकणार आहेत. 

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरातच शिक्षण मिळावे, या हेतूने या ३५ गावांची टीव्हीवरील शाळा सुरू करण्याची संकल्पना इगतपुरी तालुका शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष निवृत्ती नाठे, उमेश बैरागी, भिला अहिरे, सागर जळगावकर यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प सुरू झाला आहे. हा प्रकल्प चालविण्याची जबाबदारी शिक्षक संघाने घेतली असून, माणिकखांबचे मुख्याध्यापक राजेंद्र मोरकर त्याचे नियंत्रक आहेत. पहेचान प्रगती फाउंडेशनच्या प्रगती अजमेरा यांच्या आर्थिक सहाय्याने याची सुरवात केली आहे शालेय शिक्षणाचा प्रसारण करण्यासाठी मुंढेगाव, गोंदे, माणिकखांब, आहुर्ली, वाडीवऱ्हे येथील केबल ऑपरेटर किसन नाठे, गोपाळ नाठे, बन्सी गतीर, अर्जुन धोंगडे, विजय वाजे, उत्तम गायकर, शांताराम चव्हाण यांच्या सहकार्याने प्रसारण केले जाणार आहे. 

या गावांना लाभ 

मुंढेगाव, मुकणे, गरुडेश्वर, शेनवड खुर्द, आशाकिरणवाडी, मोगरे, वाघेरे, दराणेवाडी, कानडवाडी (लक्ष्मीनगर), जानोरी, जाधववाडी, नांदगाव बंधारा, माणिकखांब, दौंडत, खंबाळेवाडी, आडवन, वाकी, कावनाई, पाडळी देशमुख, गोंदे दुमाला, बेलगाव कुऱ्हे, कुऱ्हेगाव, वाडीवऱ्हे, मुरंबी, सांजेगाव, रायगडनगर, नांदडगाव आहुर्ली, शेवगेडांग, वडाचीवाडी, खंबाळेवाडी, बांडेवाडी, लहमागेवाडी, वांजोळे या शाळांचा समावेश आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com