तुमच्याकडे ''ब्लॅक अँड व्हाईट'' टीव्ही आहे का? लाखो रुपयांसाठी लोकांची पळापळ

black n white tv.jpg
black n white tv.jpg

नाशिक : (भऊर) भाऊ तुझ्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही हाय का रं?... सध्या याच प्रश्नांची सद्या सर्वत्र चर्चा आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीमध्ये असलेल्या लाल रंगाची छोटी नळी लाखों रुपयाला विकली जात असल्याचे बोललं जात आहे. वाचा काय आहे प्रकार?

जुने टीव्ही पुन्हा चर्चेत 

शहरी भागासोबत ग्रामीण भागातही सध्या 1960 ते 1990 च्या काळात मिळणाऱ्या ब्लॅक अँड व्हाईट अर्थात कृष्णधवल टीव्हीचा शोध सुरू झाला आहे. हा टीव्ही शोधण्याच्या कामी तरुण पिढीबरोबरच महिला वर्गही सामील झाला आहे. विशेष म्हणजे, हा शोध घेण्यामागे कारणीभूत ठरली आहे. ती या टीव्हीतल्या लाल पाऱ्याविषयीची अफवा. पूर्वीच्या काळी जुन्या कृष्णधवल टीव्हीच्या जमान्यात लाकडी शटर असलेले 17 इंचाचे मॉडेल्स पाहायला मिळत असत. या काळातील टीव्ही आणि रेडीओमध्ये एक लाल रंगाचं पाऱ्यासारखं द्रावण असलेली छोटी नळी बसवलेली असे. कालांतराने या टीव्हीचा वापर बंद झाला. नवीन टीव्ही येऊ लागले आणि लोकं या टीव्हीला विसरली. साधारण चाळीस वर्षांनंतर पुन्हा एकदा एका अफवेमुळे हे जुने टीव्ही पुन्हा चर्चेत आले आहेत.

नळीचा शोध घेण्याचं काम जोमाने सुरू

साठच्या दशकात तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये बसवली जाणारी ही लाल द्रावणाची नळी सध्या लाखो रुपयांना विकली जात असल्याची अफवा ग्रामीण भागात पसरली आहे. काहीजण हा आकडा वाढवून कोटीही सांगत आहेत. त्यामुळे अशी नळी शोधण्याच्या कामी लोक लागले आहेत. स्थानिक भाषेत रेड मर्क्युरी या नावाने ओळखली जाणारी ही नळी शोधण्यासाठी भंगार विक्रेते, टीव्ही विक्रेते यांच्याकडे विचारणा करण्यात येत आहे. काहीजण तर लाखो रुपये देऊन ती विकत घेण्याची तयारीही दर्शवत आहेत. वास्तविक दोन इंचाच्या सीलबंद असलेल्या या नळीची किंमत सर्वसामान्य आहे. पण, अफवेची शहानिशा न करता या नळीचा शोध घेण्याचं काम जोमाने सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com