हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट; तोंड देण्यासाठी महापालिका सज्ज, आयुक्तांचे सुतोवाचं

विक्रांत मते
Thursday, 8 October 2020

कोरोना संसर्गाच्या दुसया लाटेचा उल्लेख केला. सध्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या तीन ते चार हजार आहे. हिवाळ्यात दुसरी लाट येईल त्यावेळी सहा ते दहा हजार ॲक्टीव्ह रुग्ण असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

नाशिक : गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत कोरोना बाधितांमधील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होत असली तरी हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट तयार होणार असल्याचे सुतोवाच करताना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी नाशिककरांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या दुसया लाटेला तोंड देण्यासाठी महापालिका सज्ज असल्याचा विश्‍वास त्यांनी दिला. 

झुम मिटींगच्या माध्यमातून संपादक व प्रतिनिधींशी आयुक्त जाधव यांनी संवाद साधला त्यावेळी कोरोना संसर्गाच्या दुसया लाटेचा उल्लेख केला. सध्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या तीन ते चार हजार आहे. हिवाळ्यात दुसरी लाट येईल त्यावेळी सहा ते दहा हजार ॲक्टीव्ह रुग्ण असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. अमरधाम मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या विद्युत दाहीनी मध्ये मृतदेहांचे वेटींग नसले तरी भविष्यात अडचण निर्माण होवू नये यासाठी दुसरी विद्युत दाहीनी तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिम दुसया टप्प्यात अधिक कडक केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील मोहिमेत ॲप मध्ये तांत्रिक अडचणी आल्याचे त्यांनी मान्य केले. 

जुने बिटकोते संसर्गजन्य रुग्णालयात रुपांतर 

गोरगरीबांसाठी असलेले नाशिकरोड विभागातील बिटको रुग्णालयाचे खासगीकरण अजिबात केले जाणार नाही उलट रुग्णालयाचे पुर्ननिर्माण व सक्षमीकरणावर भर दिला जाणार आहे. तज्ञ डॉक्टर मिळण्यासाठी बिटको रुग्णालयात वैद्यकीय कोर्स सुरु केला जाणार असून आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नवीन बिटको रुग्णालयात परदेशातील डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी टेलिफोनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न राहतील. जुने बिटको रुग्णालय कायमस्वरुपी संसर्गजन्य आजारांवरील उपचारासाठी ठेवण्याचे आयुक्त जाधव यांनी जाहीर केले. 
 
सक्तीची कर वसुली नाही 

कोरोनामुळे पालिकेच्या उत्पन्नात तीस टक्क्यांची घट तुर्त दिसून येत असून यापुढे पाणी, स्वच्छता, आरोग्य या विषयावर अधिक निधी खर्च केला जाणार आहे. घरपट्टी, पाणीपट्टीसह विकास शुल्कात घट झाली असली तरी कोरोनाच्या परिस्थिती मध्ये सक्तीने कर वसुली केली जाणार नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्त जाधव यांनी दिले. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

आयुक्त म्हणाले 

- महिना भरात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर बेड वाढविले. 
- शहरात ३५ टक्के बाधितांवर घरीचं उपचार. 
- एका पॉझिटिव्ह रुग्णामागे ३५ ट्रेसिंग. 
- ट्रेसिंग शोधण्यात नाशिक राज्यात आघाडीवर. 
- नाशिक शहरात सर्वात कमी १.४ मृत्युदर. 
- सर्वेक्षण मोहिम तीव्र व कठोरपणे राबविणार. 
- कोरोना तपासण्यांमध्ये नाशिक राज्यात प्रथम. 
- आता फक्त १६ फिवर क्लिनिक मध्ये तपासणी. 
- गोदावरी सुशोभिकरणाला प्राधान्य. 

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second wave of corona will come in the winter nashik marathi news