काय बोलावं आता! जेव्हा कुंपणच खाते शेत; रखवालदारांच्या कारनाम्याने पोलिसही चक्रावले

house-breaking.jpg
house-breaking.jpg

नाशिक : काय बोलावं आता...! जेव्हा कुंपनच खाते शेत. ज्यांना करायची होती रखवाली त्यांनीच केला असा कारनामा, की सगळेच झाले अवाक्. रात्रीच्या शांततेचा फायदा घेत तिघांनी शिजवले षड्यंत्र. वाचा सविस्तर प्रकार

असा आहे प्रकार

गोदावरी नदीपात्राच्या सुशोभिकरण करण्याचा ठेका घेतलेल्या कंपनीच्या गोडाऊनमधील साहित्यावर सुरक्षारक्षकांनीच डल्ला मारल्याची घटना शुक्रवारी (ता. 15) उघडकीस आली. या गोडाऊनमधून सुमारे 36 हजार रूपये किमतीचे लोखंडी साहित्य चोरीस गेले असून याप्रकरणी तीन सुरक्षारक्षकांवर पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत बने, ओम ढगे व चंद्रकांत इंगोले असे संशयित सुरक्षारक्षकांची नावे आहेत. याप्रकरणी पुणे येथील सचिन सुभाष दुसाने यांनी तक्रार दाखल केली आहे. 

सुमारे 36 हजार 48 रूपये किमतीचा ऐवज लंपास 

गोदावरी नदीपात्राच्या सुशोभिकरणाचे काम बी.जी.शिर्के या कंपनीने घेतले आहे. शिर्के कंपनीचे पंचवटी येथील अमरधाम परिसरात गोडाऊन असून या गोडाऊनमध्ये हा चोरीचा प्रकार घडला. संशयित या गोडाऊनची देखभाल करीत असतांना त्यांनी गोडाऊनमधून सुमारे 36 हजार 48 रूपये किमतीचे लोखंडी ऐवज चोरून नेला. त्यात रॉड, नट बोल्ट, वायसर तसेच जॅक आणि लोखंडी पाईपांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com