बापरे! टेम्पोत पुठ्ठ्याच्या रोलने लपविले 'घबाड';  मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांचा अंदाज

सुभाष पुरकर
Saturday, 22 August 2020

 गुजरातमधून महाराष्ट्रात एक ट्रक येत असल्याची गोपनीय माहिती वडनेरभैरव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांना मिळाली होती. यानुसार सायंकाळी पाचच्या सुमारास वडाळी भोई येथील उड्डाणपुलावर पोलिस कर्मचारी नाकाबंदी केली होती. यात मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांचा अंदाज व्यक्त केला. नेमका प्रकार काय?

नाशिक / वडनेरभैरव : गुजरातमधून महाराष्ट्रात एक ट्रक येत असल्याची गोपनीय माहिती वडनेरभैरव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांना मिळाली होती. यानुसार सायंकाळी पाचच्या सुमारास वडाळी भोई येथील उड्डाणपुलावर पोलिस कर्मचारी नाकाबंदी केली होती. यात मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांचा अंदाज व्यक्त केला. नेमका प्रकार काय?

असा घडला प्रकार

गुजरातमधून महाराष्ट्रात चांदवडमार्गे अवैध विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वडनेरभैरव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांना मिळाली होती. यानुसार शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी पाचच्या सुमारास वडाळी भोई येथील उड्डाणपुलावर पोलिस कर्मचारी कृष्णा भोये, मच्छिंद्र कराड, संतोष वाघ, कैलास इंद्रेकर, दत्तू आहेर यांनी नाकाबंदी करून दारूने भरलेला ट्रक (एमएच ०४, ईएल ४३२१) अडवत वडनेरभैरव पोलिस ठाण्यात आणला. दारूचे बॉक्स लपविण्यासाठी पुठ्ठ्याच्या रोलचा वापर केलेला होता. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून ही अवैध वाहतूक सुरू होती. यात मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यात आरोपी किसनसिंग नथूसिंग चव्हाण (वय २७, रा. धोलकपूर, ता. रायपूर, जिल्हा पाळी राजस्थान) व महेशसिंग भैरवसिंग चव्हाण (वय २५, रा. नाडा, ता. ब्यावर, जि. अजमेर) आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

दोघांना ताब्यात घेतले

गुजरात राज्यातून चांदवडच्या दिशेने १२ लाख दहा हजार १६८ रुपयांची विदेशी दारूने भरलेला आयशर टेम्पो जात असल्याची माहिती वडनेरभैरव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांना मिळाल्याने सापळा रचून वडाळी भोई येथील उड्डाणपुलावर अडवून वडनेरभैरव पोलिस ठाण्यात आणून दारूसह दोघांना ताब्यात घेतले. 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seized foreign liquor from Tempo nashik marathi news