रात्रीचा थरार! ट्रकच्या संशयास्पद हालचालीने पोलीसांचा पाठलाग; सापडल्या धक्कादायक गोष्टी

युनूस शेख
Saturday, 6 February 2021

सारडा सर्कल चौकात पोलीसांना आयशर ट्रक येताना दिसला. त्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना हुलकावणी देत चालकाने पळ काढला. पोलीसांना संशय आल्याने त्यांनी ट्रकचा पाठलाग केला. रात्री दीडच्या सुमारास पाठलागचा थरार घडला. त्यावेळी पोलीसांच्या हाती धक्कादायक गोष्टी लागल्या.

नाशिक : सारडा सर्कल चौकात पोलीसांना आयशर ट्रक येताना दिसला. त्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना हुलकावणी देत चालकाने पळ काढला. पोलीसांना संशय आल्याने त्यांनी ट्रकचा पाठलाग केला. रात्री दीडच्या सुमारास पाठलागचा थरार घडला. त्यावेळी पोलीसांच्या हाती धक्कादायक गोष्टी लागल्या.

रात्री दीडच्या सुमारास पाठलागचा थरार

पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या सूचनेनुसार, बीट मार्शल सचिन आहिरे व सहाणे सारडा सर्कल चौकात उभे राहिले. त्यांना आयशर ट्रक येताना दिसला. त्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना हुलकावणी देत चालकाने पळ काढला.आहिरे आणि सहाणे यांनी दुचाकीवर ट्रकचा पाठलाग केला. त्यांनी दिलेल्या माहितीवरून सहाय्यक पोलिस निरीक्षक मुगले, पोलिस कर्मचारी सचिन म्हसदे, जाधव आदी खडकाळी भागातील सिग्नलजवळ जाऊन थांबले. तेथे पोलिसांनी आशयर ट्रक (एमएच १५, एफव्ही १३५१), संशयित वसीम अत्तार (वय ३३), फरहान शेख (२३, दोघे रा. भद्रकाली) यांना ताब्यात घेतले. पाच लाखांचा ट्रक आणि अडीच लाखांचे गोवंश जप्त केले. रात्री दीडच्या सुमारास पाठलागचा थरार घडला.  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

गोवंश मांस असा साडेसात लाखांचा ऐवज जप्त

भद्रकाली पोलिसांनी गोवंश मांसची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह गोवंश मांस असा साडेसात लाखांचा ऐवज जप्त केला. दोन संशयितांना ताब्यात घेतले. याबाबत भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला. सारडा सर्कलकडून शालिमारकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये गोवंश मांसची वाहतूक केली जात असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seized Truck action at nashik crime marathi news