माझा काय दोष..मी का "नकोशी"? लुकलुकत्या डोळ्याने 'तिने' जणू विचारले...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

सायंकाळी साडे नऊच्या दरम्यान नंदिग्राम एक्सप्रेस ने नियमित प्रवास करणारे अभिजीत डोळस व पंकज पाठक गाडीमधून उतरल्यानंतर अंधारात बाकावर लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने दोघे बाकडा जवळ गेले असता त्यांनी जे काही पाहिले ते धक्कादायक होते.

नाशिक : लासलगाव येथील रेल्वे स्थानकावर गुरुवारी (ता.२३) सायंकाळी साडेनऊच्या दरम्यान अवघी सात दिवसाची असलेली" नकोशी " बेवारस अवस्थेत आढळून आली. 

काय दोष होता माझा? मला कोणी सांगेल का?

गुरुवारी सायंकाळी साडे नऊच्या दरम्यान नंदिग्राम एक्सप्रेस ने नियमित प्रवास करणारे अभिजीत डोळस व पंकज पाठक गाडीमधून उतरल्यानंतर अंधारात बाकावर लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने दोघे बाकडा जवळ गेले असता बाळ आजवर कोणीही नसल्याचे त्यांच्या लक्षात आले बाळ एकटीच रडत आहे आजूबाजूला कोणीही नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाला माहिती दिली.

Image may contain: one or more people

दिली मायेची उब... 

रेल्वे पोलिस कर्मचारी समाधान गांगुर्डे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रेल्वेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेश महाले यांना घटना कळवली. बालेकिल्ला ताब्यात घेऊन लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर बाळकृष्ण अहिरे, परिचारिका सोनवणे व दिवेकर यांनी या बाळावर उपचार केले. यानंतर त्या बाळाला लासलगाव येथील अनाथ आश्रमाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप गुंजाळ व संगीता गुंजाळ यांना बोलावून त्यांनी मायेची उब दिली. 

Image may contain: 3 people, people standing and indoor

हेही वाचा > थरारक! "तू चल नाही तर ठार करिन"..कानपट्टीवर पिस्तूल लावत 'त्याची' लग्नाची गळ..

क्लिक करा > PHOTO : भीषण! क्षणात चक्काचूर..माय-लेकींचा करूण अंत

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A seven-day-old baby was found at the Lasalgaon train station Nashik Marathi News