'बंद'मुळे तणाव!..'इथे' दुकाने बंद करण्यास पाडले भाग... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

शहरातील नाशिकरोड, सातपूर या परिसरामध्ये सकाळपासून बंद पाळण्यात आला होता तर उर्वरित उपनगरीय परिसरातही बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. मात्र यादरम्यान, शहरात कुठेही आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडला नाही. सदरचा बंद शांततामय व कायद्याचे पालन करीत करण्याचे आवाहन वंचितच्या नेत्याकडून करण्यात आले होते.

नाशिक : सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद लाभला. मात्र, शालिमार परिसरात शुक्रवारी (ता.24) सकाळी सुरू असलेल्या दुकानदारांना दुकाने बंद करण्यास कार्यकर्त्यांनी भाग पाडल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता. मात्र, भद्रकाली पोलिसांनी 19 आंदोलकांना ताब्यात घेत कारवाई केली. तर नाशिकरोड, सातपूर या परिसरात बंद पाळण्यात आला. तर उर्वरित उपनगरीय परिसरात संमिश्र प्रतिसाद होता. दरम्यान, दुपारी, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागे घेतल्यानंतर
शहरातील जनजीवनही सुरळीत सुरू झाले.

पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी करत आंदोलन
 
सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या बंदच्या हाकेमुळे शुक्रवारी (ता.24) बंद पाळण्यात आला. या बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडी आणि बंदमध्ये सहभागी झालेल्या संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करीत घोषणाबाजी केली. 

Image may contain: one or more people

19 आंदोलकांना ताब्यात घेतले

शिवाजीरोडवरील व्यावसायिकांनी दुकाने उघडून व्यवहार सुर केल्याने 25 ते 30 आंदोलकांनी व्यावसायिकांना दुकाने बंद करा, अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी शहरात पोलिस ठाणेनिहाय कडेकोट बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे शालिमार चौकात बंदोबस्तासाठी असलेल्या भद्रकाली पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेत 19 आंदोलकांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. 
बंदला माकपानेही पाठिंबा दर्शविला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांवर कारवाई करून सायंकाळी सोडून देण्यात आले.

हेही वाचा>जिल्हा परिषदेचा वादग्रस्त कारभार : 'तुकडा गॅंग' ला मूकसंमती...

उपनगरीय परिसरातही बंदला संमिश्र प्रतिसाद

शहरातील नाशिकरोड, सातपूर या परिसरामध्ये सकाळपासून बंद पाळण्यात आला होता तर उर्वरित उपनगरीय परिसरातही बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. मात्र यादरम्यान, शहरात कुठेही आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडला नाही. सदरचा बंद शांततामय व कायद्याचे पालन करीत करण्याचे आवाहन वंचितच्या नेत्याकडून करण्यात आले होते.

Image may contain: tree, sky and outdoor

चौकाचौकांमध्ये पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

कडेकोट पोलीस बंदोबस्त बंदच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर अतिरिक्त फौजफाटाही सज्ज ठेवण्यात आला होता. राज्य राखीव दलाची तुकडी, दंगाविरोधी पथक सज्ज होते. तर, चौकाचौकांमध्ये पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. तसेच, संवेदनशिल असलेल्या शालिमार, नाशिकरोड, सातपूर, सिडको या परिसरात पोलिसांची करडी नजर होती. तसेच, गस्तीवरील वाहनांकडूनही निगराणी ठेवली जात होती.

हेही वाचा>सोळावी जनगणना...अन् तीही ऍपद्वारे?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shalimar stresses due to "closure" nashik marathi news