शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही..नगरपरियोजनेसंदर्भात लवकरच तोडगा - शरद पवार 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 18 जानेवारी 2020

शरद पवार यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नसल्याचे आश्‍वासन दिले. वादावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे नगरविकासमंत्री, स्मार्ट कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.

नाशिक : नाशिक शिवारातील हनुमानवाडी व मखमलाबाद येथील स्मार्टसिटी अंतर्गत प्रस्तावित नगरपरियोजनेला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याने त्यासंदर्भात लवकरच राज्याच्या नगरविकासमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. 

नगरपरियोजनेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली पवारांची भेट

शरद पवार शुक्रवारी (ता. 17) नाशिक दौऱ्यावर आले असताना नगरपरियोजनेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेत विरोधाचे निवेदन दिले. स्थानिक शेतकऱ्यांचा योजनेला विरोध असताना बळजबरीने योजना लादली जात आहे. ज्या जागेवर योजना राबविली जाणार आहे, ती बागायती जमीन असून, फळांसह भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो. योजना शहरापासूनच्या दूर अंतरावर किंवा पडीक जमिनीवर राबविण्याची गरज असताना बागायती जमिनीवर राबविली जात आहे. प्रारंभी नगरपरियोजना 315 एकर क्षेत्रात राबविण्याचा प्रस्ताव असताना त्यानंतर चुकीच्या पद्धतीने 754 एकर क्षेत्रावर प्रस्तावित करण्यात आली. योजना अमलात आल्यास शेतीचे क्षेत्र 45 टक्‍क्‍यांनी घटणार आहे. निसर्गाच्या आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडला असताना नगरपरियोजेच्या माध्यमातून मानवनिर्मित संकट लादले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

VIDEO "संजय राऊत यांच्या स्टेटमेंट पासून मी दूर" - शरद पवार

"अन्याय होऊ देणार नाही' 
शरद पवार यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नसल्याचे आश्‍वासन दिले. वादावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे नगरविकासमंत्री, स्मार्ट कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. गोकुळ पिंगळे, सुरेश पाटील, पंडित तिडके, अरुण महाले, शरद फडोळ, नाना तिडके, संजय पिंगळे, वासुदेव तिडके, दिनेश बच्छाव, गणपत फडोळ आदी उपस्थित होते. 

क्लिक करा > PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar on farmers Nashik Political Marathi News