PHOTOS : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात "रयत"ने रोवली शिक्षणाची बीजे : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

शिक्षणामुळे घरे बदलली सुधारणा झाली. त्यामुळे संबध घराचे चित्र बदललं. याचं कारण मुली शिक्षित झाल्या. त्याचा हा परिणाम आहे. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे बीजे रोवली त्यामुळे समाजातील गोर गरीब शिक्षित झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान घेण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने काम करावे आणि यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी देखील अक्ष घालून विद्यार्थ्यांशी शिक्षणातील गोडी अधिक वृद्धिंगत करावी असे आवाहन पवारांनी केले.

नाशिक : "रयत शिक्षण संस्थेचे हे वटवृक्षाचे रोपटे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावले. त्याला खतपाणी घालण्याचे काम आपले आहे. विद्येच्या जोरावर राज्यकर्ते चांगले निर्णय घेतील यासाठी कर्मवीर दादांनी शिक्षणाचे हे काम सुरू केले. या जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अनेक लोकांनी कामे केली. त्यात कर्मवीर भाऊसाहेब हिरे, वसंतराव नाईक यांनी शिक्षणाचे रोपटे लावले. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. हे शैक्षणिक जाळे निर्माण होण्यात महात्मा जोतीराव फुले कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री तथा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार सांगितले. विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन माजी शरद पवार यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 

Image may contain: 20 people, people standing and indoor

विद्यार्थ्यांशी शिक्षणातील गोडी अधिक वृद्धिंगत करावी

यावेळी शरद पवार म्हणाले की, .शिक्षणामुळे घरे बदलली सुधारणा झाली. त्यामुळे संबध घराचे चित्र बदललं. याचं कारण मुली शिक्षित झाल्या. त्याचा हा परिणाम आहे. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे बीजे रोवली त्यामुळे समाजातील गोर गरीब शिक्षित झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान घेण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने काम करावे आणि यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी देखील अक्ष घालून विद्यार्थ्यांशी शिक्षणातील गोडी अधिक वृद्धिंगत करावी असे आवाहन पवारांनी केले.

Image may contain: 13 people, people smiling

कर्मवीरांचे विचार पुढील काळातही रुजविण्याची जबाबदारी

नाशिक जिल्हा कृषिवर आधारित जिल्हा असून द्राक्ष, डाळिंब यासह अनेक पिके आज सुधारित पद्धतीने घेतल्याने उत्पादन वाढविले आहे. हा जिल्हा जसा अनेक दृष्टीने पुढे जातो आहे तसेच शिक्षणातही हा जिल्हा आपले नाव लौकिक मिळविल्याशिवाय राहणार नाही. या सर्वांच्या मागे कर्मवीरांचे विचार आहे ते यापुढील काळातही रुजविण्याची आपली जबाबदारी आहे. विज्ञानाचा आधार घेऊन कौशल्य विकासाचे शिक्षण घेऊन आपले घर चालवावे. असे पवार यावेळी म्हणाले.

Image may contain: 5 people, people smiling, people standing, wedding and indoor

शिक्षणाचे बीज शालेय स्तरावरून रुजवावे : भुजबळ
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह तत्कालीन समाज सेवकांनी शिक्षणाची जबाबदारी घेतल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षित झाले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे समाज सुधारक ही आपली दैवत असून त्यांची पूजा करावी असे आवाहन त्यांनी केले. याचे बीज शालेय स्तरावरून रुजवावे असे त्यांनी सांगितले.

Image may contain: 6 people, people smiling, people standing and wedding

कुठलाही वाद करण्यापेक्षा तीळ गूळ घ्या गोड गोड बोला

पालखेड डावा कालवा येथील काँक्रीटकरण तसेच नाशिक-येवला रस्त्याचे चौपदरीकरण संपूर्ण काँक्रीटीकरण केले जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या पाच वर्षात शैक्षणिक क्षेत्रात अनेक अडचणीचा सामना करावा लागला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम पवार साहेब करतात तेच जाणता राजा आहे असे त्यांनी सांगितले. राज्यकर्त्यांनी कुठलीही टीका टिपणी करून वाद करण्यापेक्षा संक्रांती निमित्त तीळ गूळ घ्या गोड गोड बोला आणि जनतेची काम करा असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

क्लिक करा > PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....

मान्यवर उपस्थित

यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री विनायक दादा पाटील, आमदार हेमंत टकले, डॉ.अनिल पाटील, ऍड. भगीरथ शिंदे,विभागीय अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, रामशेठ ठाकूर, सुनील मालपाणी, नारायणी गुरुजी, बाळकिसन मालपाणी, डॉ.भाऊसाहेब कराळे, माजी. खासदार समीर भुजबळ, आदींसह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी बांधव उपस्थित होते.

क्लिक करा > "माझ्या सासूशी फोनवर बोला अन् बायकोला नांदायला पाठवा"..तिने नकार देताच..

क्लिक करा >  PHOTO : धक्कादायक! यात्रेत चिमुरडी अचानक गायब...शोध घेतल्यावर धक्काच!

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar at vinchur for Opening ceremony Nashik Marathi News