पवारांच्या दौऱ्याने शेतकरी खुऽऽश! रेखाटले कांदाप्रश्नी बोलके चित्र; सर्वत्र चर्चेचा विषय

संपत देवगिरे
Thursday, 29 October 2020

शेतकऱ्यांचा आजही श्री. पवार यांच्यावर किती विश्वास आहे, हे सांगणारे बोलके रेखाचित्र ठेंगोडा (ता. सटाणा) येथील कांदा उत्पादक किरण दादाजी मोरे यांनी काढले आहे. त्यांचे हे चित्र सोशल मिडीयावर देखील व्हायरल होते आहे. या सबंध दौ-याचे नेमके फलित त्यांनी बोलक्या रंग, रेषांतून रेखाटले. 

नाशिक : बुधवारी (ता. 28) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकचा दौरा केला. यावेळी त्यांनी कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले. कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच खुश झाले. ठेंगोडा (बागलाण) येथील किरण दादाजी मोरे या शेतक-याने पवारांच्या भेटीचे फलित व्यक्त करणारे चित्र रेखाटले आहे. हे चित्र नाशिककरांत चांगलेच चर्चेचा विषय ठरले.

दौ-याचे नेमके फलित

संबधीत विभागाच्या प्रमुखांशी तातडीने वेळ घेऊन कांदा उत्पादक व व्यापारी प्रतिनिधींसह नवी दिल्लीत चर्चा करुन हे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यामुळे गेले पंधरा दिवस याबाबत चाचपडत असलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला. शरद पवार यांच्या तप्तरतेने जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना एक दिलासा मिळाला हे नक्की. शेतकऱ्यांचा आजही श्री. पवार यांच्यावर किती विश्वास आहे, हे सांगणारे बोलके रेखाचित्र ठेंगोडा (ता. सटाणा) येथील कांदा उत्पादक किरण दादाजी मोरे यांनी काढले आहे. त्यांचे हे चित्र सोशल मिडीयावर देखील व्हायरल होते आहे. या सबंध दौ-याचे नेमके फलित त्यांनी बोलक्या रंग, रेषांतून रेखाटले. 

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

संवादात मांडल्या समस्या

शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. त्यांचा प्रश्नांचे निरसन केले. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. कांद्याचा दरात कायम चढ-उतार ही चिंतेची बाब आहे. कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज असून निर्यात बंद करणं आणि आयात सुरु करणं परस्परविरोधी निर्णय आहेत,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे. 

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawars tour, The farmer drew a happy picture nashik marathi news