ShivJayanti 2020 :  सातासमुद्रापार शिवजयंतीचा डंका...न्यूयॉर्कच्या भारतीय दूतावासात महाराजांना मानाचा मुजरा!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 February 2020

छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम अन् स्वराज्यासाठी त्यांची निष्ठा सर्वांनाच प्रेरित करतात आणि म्हणूनच महाराष्ट्राचा डंका सातासमुद्रापार आजही वाजतो. महाराजांना प्रेरित अशा शिवजयंतीचा उत्सव हा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर न्यूयॉर्कमध्ये देखील साजरा करण्यात आला. छत्रपती फाऊंडेशन अमेरिकेत गेली ७ वर्षे शिवजयंती साजरी करत आहेत. यंदा भारत सरकारचे वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने न्यूयॉर्क शहरातील भारतीय दूतावासात (ता. १७) शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम अन् स्वराज्यासाठी त्यांची निष्ठा सर्वांनाच प्रेरित करतात आणि म्हणूनच महाराष्ट्राचा डंका सातासमुद्रापार आजही वाजतो. महाराजांना प्रेरित अशा शिवजयंतीचा उत्सव हा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर न्यूयॉर्कमध्ये देखील साजरा करण्यात आला. छत्रपती फाऊंडेशन अमेरिकेत गेली ७ वर्षे शिवजयंती साजरी करत आहेत. यंदा भारत सरकारचे वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने न्यूयॉर्क शहरातील भारतीय दूतावासात (ता. १७) शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

महाराजांच्या कार्याचा गौरव करत आदरांजली

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत आदरांजली वाहिली.यानिमित्त कलाकारांनी शिवजन्म, शिवराज्यभिषेक असे एक ना अनेक डोळ्यांचे पारणे फिटवून टाकणारे प्रयोग सादर केले. सोबत सांस्कृतिक संगीताची मेजवानी तर काही औरच.. असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम  सादर करण्यात आले. यावेळी

आजही मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक छत्तीसगड मध्ये - बाघेल

छत्तीसगड आणि विदर्भ हे एकाच बेरार प्रांताचे भाग होते आणि आजही मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक छत्तीसगड मध्ये राहतात असे सांगत महाराष्ट्रासोबत सामाजिक नाळ असल्याचे मुख्यमंत्री बाघेल यांनी सांगितले. तसेच सातासमुद्रापार इतक्या मोठया प्रमाणावर शिवजयंती साजरी केल्याबद्दल त्यांनी छत्रपती फाऊंडेशन व कॉन्स्युलेट ऑफ इंडिया इन न्युयॉर्क यांचे कौतुक केले. 

मराठी मुला-मुलींनी व्यवसायात उतरा  
गूगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या अनेक अमेरीकन कॉर्पोरेट जगतात आज भारतीय व्यक्ती  सीईओ सारख्या उच्चपदांवर आहेत. अशात 
मराठी मुला-मुलींनी व्यवसायात उतरण्याचे आवाहन करीत शिंदे यांनी कार्यक्रमात करिअर व उद्योजक मार्गदर्शन शिबिराचे महत्व सांगितले - मनोज शिंदे, उद्योगपती, (सीईओ, tCognition Softwares)

Image may contain: 4 people, indoor, possible text that says 'CONSULATE GENERAL OF INDIA NEW YORK'

शिवजयंती साजरी करणारी अमेरिकेतील प्रथम वाणिज्य दूतावास 
सामाजिक कार्य कॉन्सुल ए. के. विजयकृष्णन यांनी भारतीय वाणिज्य दूतावास यांच्यातर्फे सामाजिक उपक्रमांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच शिवजयंती साजरी करणारी अमेरिकेतील प्रथम वाणिज्य दूतावास असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. तसेच सह-आयोजक छत्रपती फाऊंडेशनच्या भावी कार्यक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले 

व्यक्तींचा विशेष सत्कार
हॉटेल टेनन्सीचे मालक महेंद्र सिनारे, मुंबई रसोईचे रोहन डाबरे व मिस भारत न्युयॉर्क २०१९ अलिशा मर्चंट तसेच छत्रपती फाऊंडेशनचे अनेक वर्षांपासून सदस्य असलेले व विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला.  

हेही वाचा > म्यानातून उसळे तलवारीची पात!...13 फुटी भव्य 'तलवार' वेधतेय नाशिककरांचे लक्ष...

विडिओ संदेशाद्वारे अनेकांच्या सदिच्छा 

यानिमित्त क्रिकेट्स्टार अजिंक्य रहाणे, खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार विनायक मेटे ह्यांनी विडिओ संदेशाद्वारे सदिच्छा दिल्या.

फाऊंडेशनतर्फे अनेक उपक्रम.. 

जिजाऊ  जयंती, आंबेडकर जयंती, शाहू जयंती, अहिल्याबाई होळकर जयंती, सावित्रीबाई फुले जयंती आदींसह इंडिया डे परेड यासारखे उपक्रम वर्षभर राबविले जातात. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष विनोद झेंडे, सचिव गौरव दळवी, कल्याण घुले (अल्बनी), अभिनव देशमुख (जॉर्जिया), ऋषिकेश माने (पेनसिल्व्हेनिया), साकेत धामणे (न्यूयॉर्क), प्रशांत भुसारी (टेनेसी), प्रियंका कुरकुरे (न्यूजर्सी), श्रद्धा सहाणे (न्यूजर्सी), सुरेश गायकवाड (कनेक्टिकट) ह्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. 

हेही वाचा > सूर्य ओकतोय आग!... थंडीच्या ब्रेकनंतर आता उन्हाचा तडाखा!...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Jayanti celebrates at Indian Embassy in New York Nashik Marathi News