भाजपला धडा शिकवण्याची संधी हुकली; शिवसेनेचा उपरोधिक टोला

shiv Sena targets BJP over privatization nashik marathi news
shiv Sena targets BJP over privatization nashik marathi news

नाशिक : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण करून कराची वसुली खासगी मक्तेदारा मार्फत करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला होता. दरम्यान तो निर्णय मागे घेतल्याने रस्त्यावर उतरण्याची शिवसेनेची संधी भाजपने हुकविली असे शिवसेनेकडून बोलण्यात येत आहे.

इतर सेवांचे खासगीकरण कधी रद्द करणार?

घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव मागे घेण्याच्या सुचना दिल्याने नाशिक दत्तक घेवून पोरके सोडलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन आहे. परंतू भाजपला रस्त्यावर येवून धडा शिकविण्याची शिवसेनेची संधी मात्र आमच्या हातून गेली याचेही दुख असल्याचा उपरोधिक टोला हाणताना घरपट्टी-पाणीपट्टीचे खासगीकरण रद्द केले परंतू भाजपच्या ठेकेदारांचे उखळं पांढरे करणाया इतर सेवांचे खासगीकरण कधी रद्द करणार असा सवाल विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी करताना भाजपवर निशाणा साधला. 

दत्तक पित्याने सत्ताधारी भाजपला शहाणपण शिकवावे

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण करून कराची वसुली खासगी मक्तेदारा मार्फत करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला होता. घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी ठेकेदार नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचल्यावर रोष निर्माण होईल, त्यातून आधीचं विकासकामे न झाल्याने भाजपवर प्रचंड नाराजी असलेले नाशिककर रस्त्यावर उतरून आमदार व नगरसेवकांना जाब विचारतील या भितीने नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केलेल्या परंतू सत्ता आल्यानंतर पोरके करून सोडलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खासगीकरणाचा प्रस्ताव मागे घेण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार प्रस्ताव मागे घेण्यात आल्याचे समजले. एक खासगीकरण रद्द केल्याबद्दल फडणवीस यांचे अभिनंदन भाजपला रस्त्यावर येवून जाब विचारण्याचा शिवसेनेचा एक मोका मात्र गमवावा लागला, याचे शिवसैनिकांना दुख आहे. खासगीकरण शिवसेनेला कदापी मान्य नाही, घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीसाठी सर्वसामान्य नागरिकांच्या दारापर्यंत जाणे हे तर अजिबातचं मान्य नाही. तसे झाले असते तर शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून वसुली बंद केली असती. असो भाजप वाल्यांचे नशीब चांगले त्यांना सुबूध्दी सुचली. परंतू एक खासगीकरण रद्द केले खरे परंतू यापुर्वी पेस्ट कन्ट्रोल, स्वच्छता, व्हाल्वमन, ड्रायव्हर आदी बाबींचे खासगीकरण केले आहे. स्मार्ट सिटीच्या कामांचा बोजवारा उडाला आहे. हे खासगीकरण रद्द करण्याबरोबरचं स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा उडालेला बोजवारा थांबविण्यासाठी दत्तक पित्याने सत्ताधारी भाजपला शहाणपण शिकवावे अशी मागणी बोरस्ते यांनी केली आहे. 

शहराचेचं खासगीकरण करा 

भाजपच्या सत्ता काळात मोठ्या प्रमाणात खासगीकरण झाले आता लोकांच्या घरापर्यंत मक्तेदार पोहोचविण्याची तयारी भाजपने सुरु केल्याने संपुर्ण शहराचेचं खासगीकरण करा असा उपरोधिक टोला श्री. बोरस्ते यांनी भाजपला लगावला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com