PHOTO : मी पुन्हा नाही, तर कधीच नाही येणार...

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 15 January 2020

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत "मी पुन्हा येईन' हे शब्द "तकिया कलाम' झाले आहेत. शक्‍य होईल त्या ठिकाणी या सुपरिचित शब्दांचा योग्य वापर केला जातो आहे.   राजकीय आखाड्यात एकमेकांना नामोहरम करण्यासाठी राजकीय पक्षांना नवीन मुद्द्यांची गरज असते. अशी संधी कधी आयतीच मिळते, तर कधी निमित्त करून संधी निर्माण केली जाते. त्यात अशा गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी वाट पाहत असतोच.

नाशिक :  राजकीय आखाड्यात एकमेकांना नामोहरम करण्यासाठी राजकीय पक्षांना नवीन मुद्द्यांची गरज असते. अशी संधी कधी आयतीच मिळते, तर कधी निमित्त करून संधी निर्माण केली जाते. त्यात अशा गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी वाट पाहत असतोच. अशीच संधी शिवसेनेने साधली असून, त्याला निमित्त मिळाले आहे मकरसंक्रांतीचे. भाजपला नामोहरम करण्यासाठी या वेळी शिवसेनेने पतंगांचा आधार घेतला आहे. 

शिवसेनेकडून पतंगांवर शब्दांचे तीर; भाजप घायाळ 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत "मी पुन्हा येईन' हे शब्द "तकिया कलाम' झाले आहेत. शक्‍य होईल त्या ठिकाणी या सुपरिचित शब्दांचा योग्य वापर केला जातो आहे. यंदाच्या मकरसंक्रांतीला हेच शब्द पतंगांवर अवतरले आहेत. पतंगाच्या समोरच्या बाजूला शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह असून, "जय महाराष्ट्र' आणि "नाद नाही करायचा' असे शब्द लिहिलेले आहेत. मागील बाजूला भाजपचे कमळ चिन्ह आणि "मी पुन्हा नाही तर, कधीच नाही येणार' असे लिहिले आहे. हे पतंग वासननगर भागात चर्चेचा विषय ठरले आहेत. शब्दांच्या या बाणांनी शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप याला कसे प्रत्युत्तर देणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. 

Image may contain: 8 people, including Prasad Kathe, people smiling

हेही वाचा > फडणवीसांना सांगा, आमच्यावरही भरोसा ठेवा - छगन भुजबळ

बच्चेकंपनीला वाटप 
येथील शिवसेनाप्रणीत मुरली फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र गामणे यांच्यातर्फे परिसरातील बालकांना हे पतंग मंगळवारी (ता. 14) प्रभाग 31 चे नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या उपस्थितीत वाटप केले. पतंग शिवराज क्रीडा प्रबोधिनीच्या मैदानावर खेळण्यासाठी जमलेल्या बालकांना वाटप करण्यात आले. पतंग हाती घेऊन बच्चेकंपनी सर्वत्र फिरत होती. या वेळी चेतन चुंभळे, राजा नाठे, मंगेश नागरे, रवींद्र धोंडे, नितीन शिंदे, प्रवीण सोनवणे, सचिन चिंचखेडे आदी उपस्थित होते.  

हेही वाचा > धरणावर वनभोजन करताना दोन विद्यार्थी गायब...शोध घेतल्यास धक्काच!..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena written on kites against bjp Nashik Marathi News