धक्कादायक....अजमीर सौंदाणे कोविड सेंटरच अस्वच्छ्

covid center 1.jpg
covid center 1.jpg

नाशिक/सटाणा : शहरातील एका लग्नघरातील नवरीचे आई-वडील कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या चाळीसहून अधिक नातलगांना प्रशासनाने या विलगीकरण केंद्रात हलविले आहे. मात्र या केंद्रात आणि प्रसाधनगृहात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आणि मिळणारे जेवणही निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यांच्यापैकी एका रुग्णाने सेंटरमधील सर्व परिस्थितीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.

त्यात अस्वच्छता आणि घाणीच्या साम्राज्यामुळेच एखाद्या चांगल्या व्यक्तीलासुद्धा कोरोनाची बाधा होण्याची शक्‍यता असल्याचा उल्लेख कोविड सेंटरमधील रुग्णांनी व्हिडिओत केला आहे. मात्र सटाणा पालिकेने बुधवारी (ता. 8) प्रसिद्धीपत्रकाद्वारे काही समाजकंटकांकडून पालिकेची विनाकारण बदनामी केली जात असल्याचे सांगितले. 


मुख्याधिकारी म्हणतात, "ही पालिकेची बदनामी' 

सटाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी कोविड सेंटरची जबाबदारी प्रशासकीयदृष्ट्या नगर परिषदेची नसून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची आहे. मात्र पालिका प्रशासनाने सामाजिक जबाबदारी म्हणून सेंटरमध्ये वेळोवेळी विविध सेवा-सुविधा पुरविल्या असताना असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे श्रीमती डगळे यांनी सांगितले. 


पदाधिकाऱ्यांची भेट

बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी बुधवारी (ता. 8) राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे व अमोल पगार यांच्यासह या कोविड सेंटरला भेट दिली. श्री. चव्हाण यांनी गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांना सेंटरमधील स्वच्छता आणि रुग्णांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com