धक्कादायक...पितृछत्र हरपले, आईचा दुसरा विवाह ..कुठलाही कौटुंबिक आधार नसल्याने युवतीचा घेतला गैरफायदा

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 5 जुलै 2020

वडिलांचे निधन झाल्यानंतर आईने दुसरा विवाह केला होता. त्यानंतर सोळा वर्षीय पीडिता नाशिक रोड परिसरात आपल्या आजीकडे राहात होती. परंतु घरगुती वादातून ती नाशिकला आली. त्यानंतर ती एकटी असल्याचे लक्षात येताच तिला फुस लावून जाळ्यात अडकविण्यात आले. धक्कादायक आपबिती...​

नाशिक : मुलीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आईने दुसरा विवाह केला होता. त्यानंतर सोळा वर्षीय पीडिता नाशिक रोड परिसरात आपल्या आजीकडे राहात होती. परंतु घरगुती वादातून ती नाशिकला आली. त्यानंतर ती एकटी असल्याचे लक्षात येताच तिला फुस लावून जाळ्यात अडकविण्यात आले. धक्कादायक आपबिती...

क्रूरतेचा कळस

जानेवारी 2019 मध्ये आलीशाने कुटुंबीयांचा आधार नसल्याचे पाहिले. प्रसंगाचा फायदा उचलत मुलीसारखा सांभाळ करेल, असे गोड बोलताना उंटवाडीतील निरीक्षणगृहाच्या समोरून पीडितेला खाण्यातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिघांनी पीडितेवर अत्याचार केला. ठार मारण्याची धमकी देताना वेळोवेळी अतिप्रसंग केल्याचेही पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. क्रूरतेचा कळस करत संशयितांनी पीडितेला अनैतिक व्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यासाठी तिला विविध ठिकाणी पाठविण्यात आले. आपली विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजल्यानंतर पीडितेने पळ काढत भद्रकाली पोलिस ठाणे गाठत आपबीती सांगितली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत भद्रकाली पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत दोघा संशयित महिलांना अटक केली असून, त्यांची कसून चौकशी केली जाते आहे. तर उर्वरित संशयित फरारी असून, त्यांचाही शोध घेतला जातो आहे. 

पितृछत्र हरपले, आईने केला दुसरा विवाह 
पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आईने दुसरा विवाह केला होता. त्यानंतर सोळा वर्षीय पीडिता नाशिक रोड परिसरात आपल्या आजीकडे राहात होती. परंतु घरगुती वादातून ती नाशिकला आली. त्यानंतर ती एकटी असल्याचे लक्षात येताच तिला फुस लावून जाळ्यात अडकविण्यात आले.

हेही वाचा > संतापजनक! "...तर गौरव आज आमच्यात असला असता.."आरोप करत नातेवाईकांनी फोडला हंबरडा..आरोग्य केंद्राची तोडफोड

अनैतिक व्यवसायात झोकण्याच्या प्रयत्न..सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कुठलाही कौटुंबिक आधार नसल्याने फुस लावत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्‍कादायक बाब पुढे आली आहे. परिस्थितीचा गैरफायदा घेतानाच पीडितेला अनैतिक व्यवसायात झोकण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या वर्षभरापासून शोषण सुरू असताना आपली विक्री होत असल्याची बाब लक्षात येताच पीडितेने पोलिसांकडे धाव घेत आपबीती सुनावली. याप्रकरणी दोघा महिलांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत पीडितेने संशयित आलीशा ऊर्फ सुलताना, गणेश, जयेश जाधव, सज्जो, शब्बी, हाजरा (रा. पंचशीलनगर) यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

हेही वाचा >प्रेरणादायी..! पत्नी खंबीर.. बेरोजगार व्यावसायिक पतीला दिली अशी साथ...संसाराचा केला स्वर्ग!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shocking crime Attempt to sell a minor girl nashik marathi news