धान्य दुकानदारांचे पालकमंत्र्यांना साकडे; ई-पॉसवर अंगठा नकोच

shopkeepers demanding no thumb impression on e poss machines nashik marathi news
shopkeepers demanding no thumb impression on e poss machines nashik marathi news

नाशिक/येवला : कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी ऑगस्टमध्ये शिधावाटपासाठी शिधापत्रिकाधारकांचा ई-पॉसवर अंगठा घेणे बंधनकारक केले आहे. सरकारकडून दुकानदारांना कोणतेही सुरक्षेचे साधन नसताना सरकारने घेतलेल्या या निर्णयाने दुकानदारांमध्ये  भीती निर्माण झाली असून, केवळ स्वस्त धान्य दुकानदारांचे अंगठे प्रमाणित करून रेशनमाल वाटपाची परवानगी द्यावी, अशी मागणी येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मे ते जुलै महिन्यात शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस यंत्रावर अंगठा न घेता धान्य वितरित करण्याच्या सूचना सरकारद्वारे देण्यात आल्या होत्या. ऑगस्टपासून धान्य वितरण करताना पुन्हा अंगठा पद्धत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जनतेसह धान्य दुकानदारांकडून रोष व्यक्त होत आहे. जनतेला स्वस्त आणि मोफत धान्याचा लाभ मिळावा म्हणून थम पद्धत तात्पुरती बंद केली होती. मात्र कोरोनाचे संकट कमी न होता वाढत आहे. त्यातच मशिनवर अंगठा देण्याची पद्धत सुरू केल्याने एका ग्राहकाला धान्य देण्यासाठी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. ही स्थिती पाहता बायोमेट्रिक पद्धत आणखी काही दिवस बंद ठेवावी व स्वस्त धान्य दुकानदारांचे अंगठे प्रमाणित करून लाभार्थ्यांना मालवाटपाची परवानगी मिळावी, असे निवेदनात म्हटले आहे. 

या वेळी ज्येष्ठ वितरक बाबूलाल कासलीवाल, राजेंद्र घोडके, मुकुंद कासार, दिलीप दिवटे, भास्कर कोंढरे, सुरेश मढवई, सतीश काळे, अविनाश गवांदे, पारस डोषी  आदी दुकानदार या वेळी उपस्थित होते.  

संपादन- रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com