esakal | महापालिकेच्या अभय योजनेला अल्प प्रतिसाद; घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट घटविले
sakal

बोलून बातमी शोधा

nmc2.jpg

गेल्या आठ महिन्यांत अवघे ६६ कोटी रुपयांची घरपट्टी जमा झाली. घरपट्टी वसुली करताना दबाव न आणता अभय योजना राबविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला. त्यानुसार १ नोव्हेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. 

महापालिकेच्या अभय योजनेला अल्प प्रतिसाद; घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट घटविले

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरपट्टीची अपेक्षित वसुली होत नसल्याने पालिकेने अभय योजना सुरू केली; परंतु योजनेच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये अवघे तीन कोटी रुपये महसूल जमा झाल्याने अल्प प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, यंदा घरपट्टीतून १७० कोटी रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट होते. परंतु कोरोनामुळे अपेक्षित वसुली होत नसल्याने ११० कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. 

१ नोव्हेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी

महापालिका प्रशासनाला यंदा थकबाकीसह तीनशे कोटी रुपयांचे घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्रशासनाला यंदा घरपट्टीच्या थकबाकीचा आकडा तर ३०० कोटींवर गेला आहे. गेल्या आठ महिन्यांत अवघे ६६ कोटी रुपयांची घरपट्टी जमा झाली. घरपट्टी वसुली करताना दबाव न आणता अभय योजना राबविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला. त्यानुसार १ नोव्हेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. 

११० कोटी रुपये उद्दिष्ट निश्‍चित

१ नोव्हेंबर २०२० ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत योजनेचा लाभ घेतल्यास ७५ टक्के, १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत योजनेचा लाभ घेतल्यास ५० टक्के, तर १६ ते २८ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान योजनेचा लाभ घेतल्यास २५ टक्के सवलत मिळणार आहे. योजना अंमलबजावणीच्या पहिल्या पंधरा दिवसांत तीन कोटी रुपये महसूल मिळाला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता घरपट्टी वसुलीचे १७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. अपेक्षित वसुली होत नसल्याने ११० कोटी रुपये उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पाणीपट्टी वसुली घटली 

घरपट्टीपाठोपाठ पाणीपट्टी वसुलीतही मोठी घट झाली आहे. चालु आर्थिक वर्षात पाणीपट्टीचे १०७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. आठ महिन्यांत १५.७८ कोटी रुपये वसुली झाली. ५४ हजार ८१९ नळधारकांकडे ७२.८२ कोटी रुपये थकबाकी आहे.  

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?