आता जनावरांनाही मिळणार 'आधार'! स्वतंत्र नोंदणी करून लावणार टॅग; संपूर्ण डाटा शासनाकडे

अजित देसाई
Saturday, 24 October 2020

शासनाच्या ‘ई-नाफ’ या पोर्टलवर संकलित माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू असून, ऑक्टोबर २०२० अखेर तालुक्यातील सर्व जनावरांना टॅगिंग लावण्यात येईल, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी दिली.

नाशिक : (सिन्नर) माणसांप्रमाणे स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, यासाठी आधारच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून जनावरांची नोंदणी करून त्यांच्या कानात टॅगिंग (आधार) करण्याचे काम हाती घेतले आहे. यात सिन्नर तालुक्यातील ९३ हजार २०० गोवंश जनावरांना हे टॅगिंग होणार असून, या जनावरांचा संपूर्ण डाटा शासनाकडे संकलित होणार आहे. 

गोवंश जनावरांची इत्यंभूत माहिती एका क्लिकवर

माणसांसाठी असलेल्या आधारप्रमाणे जनावरांच्या कानातील टॅगिंगवरील नंबर काम करणार आहे. यासाठी सिन्नर पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातील १२८ गावांमधील २० पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत जनावरांना टॅगिंग करण्याची मोहीम सुरू केली आहे. यात आतापर्यंत ३२ टक्के काम पूर्ण झाले आहे. शासनाच्या ‘ई-नाफ’ या पोर्टलवर संकलित माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू असून, ऑक्टोबर २०२० अखेर तालुक्यातील सर्व जनावरांना टॅगिंग लावण्यात येईल, अशी माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी दिली. जनावरांचे वय, लसीकरण, गाय-म्हैस माजावर आल्याची तारीख, गर्भधारणा काळ, जनावरे व्यायल्याची तारीख आदी माहिती या टॅगिंगच्या माध्यमातून पोर्टलवर अद्ययावत केली जाणार आहे. माणसांप्रमाणेच गोवंश जनावरांची इत्यंभूत माहिती यापुढे एका क्लिकवर प्राप्त होणार आहे. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

लाळ, खरकुताची लस उपलब्ध 

सिन्नर तालुक्यासाठी ८६ हजार ९०० लाळ, खुरकुत लस मात्रेचे वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या पशुवैद्यकाशी संपर्क साधून या लसीचे जनावरांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागाने केले आहे. 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sinnar will be registered and tagged with 93 thousand cattle nashik marathi news