Gram Panchayat election : सिन्नरमध्ये कोकाटे बंधूना दे धक्का! सख्ख्या भावानेच केला पराभव

kokate 2.jpg
kokate 2.jpg

सिन्नर (जि.नाशिक) : आमदार कोकाटे यांच्या राजकारणाला त्यांच्या घरातूनच धक्का बसला. कोकाटे यांच्या राजकारणाला गावातूनच मिळालेली नापंसती चर्चेचा विषय आहे. आमदार कोकाटे तालुक्याचे राजकारण करीत असल्याने त्यांच्या राजकारणावर त्याचा थेट परिणाम होणार नाही. मात्र घरातच घरच्यांनी त्यांच्या घरच्यांनीच नाकारले असा संदेश गेला आहे.

सोमंठाणे (सिन्नर) ग्रामपंचायतीत मोठा धक्का

सोमठाणे ग्रामपंचायत निवडणूकीत आमदार कोकाटे यांच्या विरोधात त्यांचे संख्खे बंधु भरत शिवाजीराव कोकाटे यांच्या पॅनेलचे आव्हान होते. आज झालेल्या मतमोजणीत भरत कोकाटे यांच्या पॅनेलला अकरा पैकी सात जागा मिळाल्या. आमदार कोकाटे यांच्या पॅनेलला फक्त चार जागा मिळाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पॅनेलचा सोमंठाणे (सिन्नर) ग्रामपंचायत मोठा धक्का बसला. आमदार कोकाटेच्या पॅनेलचे त्यांचे बंधु भरत शिवाजीराव कोकाटे यांनी सात जागा जिंकून पराभव केला. हा कोकाटे यांना त्यांच्या घरातूनच बसलेला मोठा राजकीय धक्का मानला जातो.

विजयी उमेदवारांची मिरवणूक
निकाल जाहीर झाल्यावर भरत कोकाटे यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. तर गावात त्यांची व विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. भरत कोकाटे यांच्या पॅनेलचे विजयी उमेदवार असे, भरत शिवाजीराव कोकाटे, मंगल साहेबराव कोकाटे, सुनिता दयाराम कोकाटे, संदीप कुंडलीक धोकरट, मंगल संजय धोकरट, जयश्री जालींदर कोकाटे आणि मिना मधुकर माळी यांची बिनविरोध निवड झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com