VIDEO : "अन्यथा या पेक्षाही मोठे आंदोलन करू"..मुंबई-नाशिक महामार्गावर सिटूचा ठिय्या

गोपाळ शिंदे : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

"मोदीजी शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांचे मत घेवून सत्ता स्थापन केली. उद्योगपतींचे चोचले थांबवून ज्या कामगारांनी त्यांचे बंगले बांधले त्यांना किमान स्वताचे घर तरी द्या. प्रचंड महागाईच्या खाईत जनतेला लोटून कोणते देश हित साधणार आहे. हितच साधायचे असेल तर शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा. स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांत प्राधान्याने घ्यावे. अन्यथा या पेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल" असा इशारा सिटूचे जिल्हा नेते कॉ.देविदास आडोळे यांनी मोर्चा दरम्यान सरकारला दिला.

नाशिक : "मोदीजी शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांचे मत घेवून सत्ता स्थापन केली. उद्योगपतींचे चोचले थांबवून ज्या कामगारांनी त्यांचे बंगले बांधले त्यांना किमान स्वताचे घर तरी द्या. प्रचंड महागाईच्या खाईत जनतेला लोटून कोणते देश हित साधणार आहे. हितच साधायचे असेल तर शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा. स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांत प्राधान्याने घ्यावे. अन्यथा या पेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल" असा इशारा सिटूचे जिल्हा नेते कॉ.देविदास आडोळे यांनी मोर्चा दरम्यान सरकारला दिला.

 

Image may contain: 5 people, crowd and outdoor

भुतो न भविष्यती असा मोर्चा​

भाजप सरकारच्या शेतकरी,कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवार (ता.८ ) दुपारी बारा वाजता शहरातून सिटूच्या वतीने मोर्चा काढत काही काळ मुंबई नाशिक महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. मोर्चेकऱ्यांनी निवेदन देताच पोलिसांनी तातडीने वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. शहरातील बेंक ऑफ इंडिया कार्यालयापासून अकरा वाजता मोर्चाला सुरवात मोर्चात सहभागी कामगार,शेतकरी, शेतमजुरांनी विविध घोषणांचे फलक हातात घेत भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली. मोदी शाहा हटाव,देश बचाव,कामगार एकता जिंदाबाद,शेतकरी एकजुटीचा विजय असो आदी घोषणाबाजीने शहर व परिसर दुमदुमून गेला होता. या मोर्च्यात आशा कर्मचा-यांनी  मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला होता. सिटूच्या वतीने प्रथमच सर्वच स्तरातील नागरिकांसमवेत भुतोनभविष्यती असा मोर्चा काढण्यात आला.

Image may contain: 6 people, people smiling, crowd, car and outdoor

चोख बंदोबस्तात मोर्चा..

विभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे,इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, वाडी-र्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल खोंडे, पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी,आनंदा माळी,सहाय्यक उपनिरीक्षक अनिल धुमसे,पोलीस हवालदार भास्कर महाले, बिपीन जगताप, गोपनीय कर्मचारी गणेश सोनवणे,गणेश गोसावी,विक्रम झाल्टे,अमोल केदारे,विश्वास पाटील यांनी चोख बंदोबस्तात मोर्चा हाताळला.

Image may contain: 5 people, crowd and outdoor

हेही वाचा > पोलिस रस्त्यावर दिसला.. तरच नागरिक-पोलिसातील दुरावा कमी होईल

मोठ्या प्रमाणात यांचा सहभाग

चंद्रकांत लाखे,कामगार नेते कांतीलाल गरूड,तालुकाध्यक्ष दत्ता राक्षे,शिवराम बांबळे,विश्वास दुभाषे,रवींद्र गतीर,निवृत्ती कडू,सदाशिव डाके,आप्पा भोले,निलेश बोराडे,मनोज भोर यांसह मोठ्याप्रमाणात मोर्च्यात शेतकरी,कामगार,घरकामगार,बेरोजगार तरुण सहभागी झाले होते.
 

नक्की बघा > PHOTOS : सहनशीलतेची हद्द पार..ज्येष्ठ रुग्णाचा पाहिला अंत.. रुग्णालय सामान्यांसाठी की धनदांडग्यांसाठी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SITU workers strike at mumbai nashik highway Nashik marathi News