esakal | VIDEO : साडेसहाशे किलो पंचधातूचा भारदस्त ''बाप्पा''..! बाप्पाच्या प्रेमापोटी गणेशमू्र्ती बनविण्याचा विक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh murti 651.jpg

कुठल्याही मूर्तीची नक्कल न करता अथर्वशिर्षच्या आधारे मू्र्ती तयार करण्यात आली आहे. या मू्र्तीमध्ये गणेशयंत्रही ठेवण्यात आले आहे. मूर्ती तयार करण्यासाठी आधी शाडूची मूर्ती तयार करून मान्यता घेतली. त्यावरून प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा साचा बनवून फायबरची मूर्ती तयार केली. पुन्हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा साचा तयार करून मेणाद्वारे मूर्ती तयार केली. त्यावरून धातूची अंतिम मूर्ती तयार झाली आहे

VIDEO : साडेसहाशे किलो पंचधातूचा भारदस्त ''बाप्पा''..! बाप्पाच्या प्रेमापोटी गणेशमू्र्ती बनविण्याचा विक्रम

sakal_logo
By
सोमनाथ कोकरे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मांगल्याचे रूप असलेल्या गणरायाचे आकर्षण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे. बाप्पाविषयीच्या या प्रेमापोटी शहरात एकमेव वजनदार ठरेल अशी गणेशमू्र्ती बनविण्याचा विक्रम अंजनेरी येथे अंतिम टप्प्यात आहे. सिद्धिविनायकाची मूर्ती अखंड तयार केली असून, ‘श्रीं’चे तब्बल ६५१ किलोंचे वजनदाररूप भाविकांना बघायला मिळेल. 

साडेसहाशे किलो पंचधातूची ‘श्रीं’ची मूर्ती 
ज्येष्ठ शिल्पकार शरद मैद यांच्या मिनल आर्टमध्ये मूर्ती साकारण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. तांबे, जस्त, कथील, चांदी, सोने अशा पंच धातूपासून तयार केलेली व भरीव असलेली ही पहिली मूर्ती ठरणार आहे. या मू्तीचे धातूमधील ओतकाम पू्र्ण झाले असून, या मूर्तीस अंतिम रूप देण्याचे काम सुयोग व समीर मैंद हे युवा शिल्पकार करीत आहेत.

युवा कलाकारांची कलाकृती अंतिम टप्प्यात 

कुठल्याही मूर्तीची नक्कल न करता अथर्वशिर्षच्या आधारे मू्र्ती तयार करण्यात आली आहे. या मू्र्तीमध्ये गणेशयंत्रही ठेवण्यात आले आहे. मूर्ती तयार करण्यासाठी आधी शाडूची मूर्ती तयार करून मान्यता घेतली. त्यावरून प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा साचा बनवून फायबरची मूर्ती तयार केली. पुन्हा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा साचा तयार करून मेणाद्वारे मूर्ती तयार केली. त्यावरून धातूची अंतिम मूर्ती तयार झाली आहे. या सर्व कामासाठी शाडू, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, मेण, धातू यांचा वापर केला आहे. धातू वितळविण्यासाठी उच्च तापमान असलेल्या भट्ट्यांचा वापर केला आहे. शिल्पकार शरद मैंद यांनी तयार केलेल्या अनेक कलाकृती मॉरिशस, अमेरिका, नेपाळमध्ये गेल्या आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथेही विविध देव-देवतांच्या मूर्ती व शिल्प गेली आहेत. 

हेही वाचा > रात्रीची वेळ..भयानक अंधार..शिक्षक चेकपोस्टवर ड्युटीवर असतानाच निघाला ६ फुटी कोब्रा!

मूर्तीची वैशिष्ट्ये 
साडेतीन फूट उंचीच्या मूर्तीच्या हातात पाश, अंकुश, मोदक आहेत. एका हाताने आशीर्वाद देत आहे. मूर्तीपुढे पंचधातूचाच मुशकही असेल. ही मूर्ती पेठ रोडवरील मेहेरधाम, साळी फार्म, सिद्धिविनायकनगर येथे बसवली जाणार आहे. (कै.) उज्ज्वला साळी (धेंड) यांची संकल्पना असून, संस्थापक अध्यक्ष सागर साळी (धेंड) तर प्रेरणास्थान रमाकांतशेठ साळी (धेंड) हे आहेत. 

हेही वाचा > नाशिक दत्तक घेणारे कुठे गेले?...शिवसेनेचा सवाल