सहा वर्षीय चिमुकलीचा शिक्षकाकडून विनयभंग; घटनेने परिसरात संताप

girl cry.jpg
girl cry.jpg

नाशिक : शिक्षकी पेशाला कलंक लावणारी घटना घडली आहे. बराच वेळ उलटला तरीही मुलगी घरी न आल्याने आईने मुलाला क्लासमध्ये पाठवलं. घडलेल्या प्रकाराने मुलगाही घाबरलाच. घटनेने परिसरात उमटताय संतापजनक प्रतिक्रीया. नात्याला काळीमा फासणारी घटना...

असा आहे प्रकार

मंगळवारी (दि.२०) रोजी सायंकाळी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यावल शहरातील आयेशा नगर भागात सईद बेग गुलाब बेग मिर्झा (वय ३२ रा. डांगपुरा यावल) हा खासगी क्लास घेत होता. सहा ते सात या वेळेत एक मुलगी शिकवणीसाठी आली होती. बराच वेळ उलटून गेली तरीही मुलगी घरी न आल्याने तिच्या अल्पवयीन भावास शोध घेण्यासाठी आईने पाठवले. याच दरम्यान ही घटना उघडकीस आली. सईद बेग गुलाब बेग मिर्झा याने त्या चिमुकलीसोबत विनयभंग केला. तिच्या भावाने घडलेला प्रकार घरी येऊन सांगितला. संतप्त झालेल्या पालकांनी आणि जमावाने शिक्षकाला चांगलाच चोप देवून पोलिसांच्या स्वाधीन केले.

शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी यावल पोलिसात पोस्को कायदा अन्वय बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षणसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सूनिता कोळपकर, सहायक फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com