स्विफ्ट कारमधून धुळ्याहून मुंबईला पोहचवायचे होते घबाड...मध्येच फिस्कटला प्लॅन अन् झाला खुलासा!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 July 2020

धुळ्याहून नाशिकमार्गे मुंबईत काही जण स्विफ्ट डिझायर कारमधून जाणार आहेत, अशी माहिती मिळाली..चालक व त्यांच्या साथीदारांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. ​पण...

नाशिक/ म्हसरूळ : धुळ्याहून नाशिकमार्गे मुंबईत काही जण स्विफ्ट डिझायर कारमधून जाणार आहेत, अशी माहिती मिळाली..चालक व त्यांच्या साथीदारांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. ​पण...

याबाबत अधिक महिती अशी
धुळ्याहून नाशिकमार्गे मुंबईत गांजाविक्री करण्यासाठी काही जण स्विफ्ट डिझायर कारमधून जाणार आहेत, अशी माहिती आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली. त्यावरून दहावा मैल येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नाकाबंदी ठिकाणी शनिवारी (ता. ११) रात्री सव्वाअकराच्या सुमारास वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक तोडकर, उपनिरीक्षक जितेंद्र माळी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिलीप शिंदे, हवालदार कहांडळ, जाधव, गांगुर्डे, पोलिस नाईक कंदीलकर, सूर्यवंशी, घुगे, पोलिस शिपाई चासकर, वाल्मीक पाटील, पोलिस शिपाई शरद ढिकले आदींनी सापळा रचला.

पाच जणांना अटक; नऊ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

धुळे येथून नाशिकला येणारी स्विफ्ट डिझायर कार (एमएच १८, एजे २१२३) पोलिसांनी थांबविली. चालक व त्यांच्या साथीदारांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी गाडीतील भिसन पावरा, भूषण भोई, राजेश पावरा, विकास पावरा, कमलसिंग पावरा यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून ३२ किलो गांजा, स्विफ्ट डिझायर कार, रोकड, चार मोबाईल असा एकूण ९ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. डी. बिडकर तपास करीत आहेत. 

धुळ्याहून मुंबईला गांजाची तस्करी

धुळ्याहून नाशिकला अवैध गांजाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना आडगाव पोलिसांनी दहावा मैल येथे अटक केली. त्यांच्याकडून ३२ किलो गांजा, एक स्विफ्ट डिझायर कार, रोकड, चार मोबाईल असा एकूण नऊ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smuggling crime from Dhule to Mumbai nashik marathi news