व्यावसायिकाला धमकी देत लुटले एक लाखाला; तिघे संशयित ताब्यात

crime23.jpg
crime23.jpg

नाशिक : रात्रीची वेळ...दुकान बंद करुन ते घरी जाण्यासाठी निघाले. तिघा संशयितांनी त्यांना रोखून जीवे ठार मारण्याची धमकी देत एक लाखाची रोकड असलेली बॅग, मोबाइल हिसकावून मोटारीचे नुकसान करुन पळ काढल्याची घटना घडली.  याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी मल्हारखाण झोपडपट्टीतून तिघा संशयितांना अटक केली. वाचा सविस्तर प्रकार

अशी आहे घटना

शुक्रवारी (ता. 23) अशोकस्तंभ येथील पशुंच्या गोळ्या-औषधविक्रीचे दर्पण नावाचे दुकान मालक विशाल रमेश वासवानी हे दुकान बंद करुन घरी निघाले. कारने जात असतांना यावेळी संशयित आरोपी सुरज आहिरे (रा. लवकुश चाळ, सातपूर), अविनाश रणदिवे व त्याचा साथीदार (रा. मल्हारखाण), तसेच त्यांचा तिसरा साथीदार निलेश हिरामण झोले यांनी वासवानी यांना मारहाण करत त्यांच्याजवळील रोकडची बॅग हिसकावून कारचे नुकसान केले. 'तू आमच्या गँगला ओळखत नाही का?' अशी धमकी देत बॅग घेऊन पळ काढला. घटनेबाबत विशाल वासवानी यांनी तक्रार दाखल केली.  

वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमंत सोमवंशी यांनी गुन्हे शोध पथकाला संशयितांचा माग काढण्याचे आदेश दिले. अवघ्या काही तासांत शनिवारी रात्रीपर्यंत तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक नाहीद शेख हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com