आतापर्यंत महापालिकेचे तब्बल 'इतके' आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित; वाचा सविस्तर

विक्रांत मते
Wednesday, 16 September 2020

कोरोनाग्रस्त रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या महापालिकेच्या ६७ आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. 

नाशिक : कोरोनाग्रस्त रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या महापालिकेच्या ६७ आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. 

हेही वाचा > "आई गं..तुझी आठवण येतेय.."भेदरलेल्या अवस्थेत चिमुरडा एकटाच रस्त्यावर; सोशल मिडियामुळे झाला चमत्कार

शहरात सहा एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण गोविंद नगर भागात आढळला. त्यानंतर महापालिकेने तपासणी मोहिम हाती घेतली त्यात आतापर्यंत एक लाख ४७ हजार ८१६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांपैकी ३७ हजार ५८५ नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून यात महापालिकेच्या ६७ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण १ लाख १३ हजार ८०८ नागरिकांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

हेही वाचा > सहनशक्तीचा बांध तुटला! विवाहितेने विहिरीत उडी घेत संपविली जीवनयात्रा; काय घडले?

एका पॉझिटिव्ह रुग्णांमागे त्याच्या संपर्कात आलेल्या ३४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्याची संख्या २ लाख ४५ हजार ४६८ एवढी आहे. ४.४२ लाख घरांमधील १५.७१ लाख नागरिकांचे पालिकेच्या शिक्षकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात सर्दी, खोकला, ताप, रक्तदाब व मुधमेहाचा आजार आहे का याबाबत विचारणा करण्यात आली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So far 67 health workers of Nashik Municipal Corporation have been affected nashik marathi news