त्र्यंबकेश्‍वरला आदिवासी पाडे झाले ‘प्रकाशमय’; खासदारांच्या पाठपुराव्याला यश

विनोद बेदरकर
Monday, 28 September 2020

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांतील अनेक गावांत वीजपुरवठा होत नसल्याने येथील ग्रामस्थ अंधारात होते. ही अडचण लक्षात घेऊन खासदार गोडसे यांनी इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आदिवासी भागातील गावांना सौर पथदिवे बसविण्याविषयी साकडे घातले.

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अद्याप वीजच न पोचलेल्या आदिवासी वाड्या-पाड्यांवर खासदार हेमंत गोडसे यांनी इंडियन ऑइल कंपनीच्या सीएसआर निधीतून प्रायोगिक तत्त्वावर सव्वाशे सौरदीप कार्यान्वित झाल्याने तालुक्यातील अनेक गावांत विजेचा लखलखाट झाला असून, गावे प्रकाशमय झाली आहेत. यामुळे आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

आदिवासी पाडे उजळून निघाले

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांतील अनेक गावांत वीजपुरवठा होत नसल्याने येथील ग्रामस्थ अंधारात होते. ही अडचण लक्षात घेऊन खासदार गोडसे यांनी इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आदिवासी भागातील गावांना सौर पथदिवे बसविण्याविषयी साकडे घातले. चार महिन्यांपूर्वी ऑइल कंपनीच्या शिष्टमंडळाने आदिवासी भागात पाहणी केली. दुर्गम आदिवासी भागातील ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत असल्याचे लक्षात आल्याने कंपनीने संबंधित गावांमध्ये सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने कंपनीने नुकतेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाड्या, पाडे, वस्तीवर सुमारे सव्वाशे सौर पथदिवे कार्यान्वित केली. त्यामुळे अनेक आदिवासी पाडे उजळून निघाले. येत्या काळात आणखी काही गावांत सौर पथदिवे बसविण्याचा मानस इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांतील अनेक गावांमध्ये सौरदीप बसविण्यात आले आहेत. याशिवाय इतरही काही गावांमध्ये येत्या काळात सौरदीप बसविणार येणार आहेत. यामुळे नागरिकांसह विद्यार्थी व वयोवृद्धांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल. 
- हेमंत गोडसे, खासदार 

सौरदीप बसविलेली गावे : (कंसात पथदीप संख्या) 
बाफणवीर (२०) : रानपाडा, बुगतपाडा, पाटाचामाळ, वांगणपाडा 
वेळंजे (१५) : पत्र्याचा मळा, आळीमाळ, बोरीचीखळ, भोगाळा, काशीद वस्ती, जोशी विहीर, चितेकर वस्ती, पलंदी 
मांजरमाळ (१५) : हसननाईकवाडी, उंबरविहीर, खरंबपाडा 
वरसविहीर (१५) : डगळे, ढोरे, जावळे व नारळे, पागी वस्ती 
हेदुलीपाडा (१५) : हेदअंबा, उघडे, भोईर, लिलके, निंबोरे वस्ती 
वाघेरा (२५) : घोडीपाडा, फौजदारपाडा, बदादे वस्ती, दोबाडपाडा 
कळमुस्ते (१०) : गावंदवाडी, हर्षवाडी, बुरंगेवस्ती 
हरसूल (५) : आळीवमाळ, कातकरी वस्ती 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solar lights were installed on tribal villages nashik marathi news