"पप्पा तुम्ही लवकर परत या!" चिमुकल्याची आर्त हाक...काळजाला फोडला पाझर

 विजय पाटील : सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 21 January 2020

कोवळ्या वयातच डोक्‍यावरून बापाचे छत्र हिरावले गेले...त्यानंतर सगळे बालहट्ट अर्धवटच राहिले...पुढे काही दिवसांनी या चिमुकल्यावरच निबंध लिहिण्याची वेळ आली. मात्र त्याने लिहिलेला निबंध वाचणाऱ्याच्या काळजालाच पाझर फोडत आहे...त्याचा हा निबंध आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नाशिक : मंगेश वाळके (वय १०) वर्ष बीड जिल्ह्यातील वाळकेवाडीतल्या शाळेत मंगेश चौथ्या वर्गात शिकतो आहे. गेल्या महिन्यातच मंगेशच्या वडिलांचे क्षयरोगाने (टी बी) निधन झाले.वडिलांच्या दुःखातून अजून त्याचे कुटुंब सावरलेले नाही.अशातच चौथीत असलेल्या मंगेशवर माझे वडील या विषयावर निबंध लिहिण्याची वेळ आली. त्याचा हा सध्या निबंध सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 

मंगेशने लिहिलेला निबंध 
" माझे नाव मंगेश परमेश्वर वाळके..माझ्या पप्पाचे नांव परमेश्वर वाळके असे होते.माझ्या पप्पांला टी.बी.चा आजार झाला होता.म्हणून माझ्या मम्मीने मला मामाच्या गावाला पाठवले होते.माझे पप्पा वारले. माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे.मला खाऊ आणायचे वही, पेन आणायचे माझा लाड करत होते.मला पप्पा लई आवडत होते. माझे पप्पा 18 ला वारले. माझी मम्मी खूप रडली. मी बी लई रडलो.तेव्हा आमच्या घरी पाव्हने आले होते. माझे पप्पा खूप मायाळू होते. ते म्हणायचे मंगेश तू शिकून मोठा साहेब हो. पप्पा घरात नसल्यावर कोणीच कोणाला मदत करत नाही. त्यांनी एकदा खोल पाण्यातून आमच्या गाईला काढले. मला पप्पाची आठवण येते. रात्रीच्याला आम्हाला चोरांची भीती वाटते. पप्पा तुम्ही लवकर घरी या." वडील गेल्या नंतर मंगेशने स्वतःला होत असलेल्या वेदनांना निबंधातून वाट मोकळी करून दिली.त्याच्या शिक्षिकेने जेव्हा मंगेशने लिहिलेला निबंध वाचला तेव्हा त्यांनाही रडू आवरले नाही.मंगेशचा हा निबंध राज्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला.त्याचे दुःख वाचून लोकही हळहळ व्यक्त करत आहेत.  

No photo description available.

हेही वाचा>  लघुशंकेसाठी थांबणे असे महागात पडले की..

हेही वाचा>  PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son written emotional letter Essay Nashik Marathi News