Powerat80 : कार्यपद्धती व वेळेसंदर्भात अचूक पालन कसे करावे, याचे एकमेव उदाहरण!

zirwal and sp.jpg
zirwal and sp.jpg

नाशिक : शरद पवारसाहेब यांनी जसे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण केले तसेच अगदी समुद्रातील पाणबुडीपासून ते हवेतील मिग- २१ विमानापर्यंतचा गाढा अभ्यास त्यांना आहे. क्रिकेटचे मैदान, सीमेवरील जवान, शेतातील मजूर असो वा शेतकरी, समुद्रात मासे धरणारा असो वा कोळसा खाणीत काम करणारा कामगार कुणाचाही प्रश्न शरद पवार सोडवताना दिसतात. शेतीबाबतीत जमिनीत कोणते पीक घ्यावे व वेलीवर कोणते पीक घ्यावे, ही माहिती त्यांना आहे.

ऑलराउंडर व्यक्तिमत्त्व - शरद पवार 
प्रशासनावर उत्तम पकड व प्रशासकीय व्यक्तींमध्ये आदरयुक्त दरारा असलेले एकमेव नाव म्हणजे शरद पवार. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणाचा अनुभव असल्यामुळे प्रशासन कसे हाताळावे, याची पूर्णपणे खडान् खडा माहिती शरद पवारसाहेबांना आहे. तरुणांना लाजवेल, अशी कार्यपद्धती व आजही वेळेसंदर्भात अचूक पालन कसे करावे, याचे एकमेव उदाहरण शरद पवार यांच्या कायार्तून दिसते. - नरहरी हिरवाळ, उपाध्यक्ष, विधानसभा 

एक उत्तम ऑलराउंडर व्यक्तिमत्त्व म्हणजे पवारसाहेब होय. प्रत्येक विभागातील तांत्रिक व भौगोलिक गोष्टी माहिती असल्यामुळे पवारसाहेबांनी सांगितलेले काम अधिकाऱ्यांना करताना कोणत्याही प्रकारची मनमानी वा टाळाटाळ करता येत नाही, हे विशेष! यामुळे नियमात बसून काम कसे करावे, याची उत्तम माहिती अधिकाऱ्यांना मिळते. अतिशय स्पष्ट काम करण्याची पद्धती असल्यामुळे नेमात असेल तर काम करणे व कायद्याच्या चौकटीत बसत नसेल, तर त्या कामाला हात न लावता देणे, असा दरारा पवारसाहेबांनी प्रशासनावर कायम ठेवला आहे. 


केंद्रातील संरक्षणमंत्रिपद असो की कृषिमंत्री पद, ज्याही खात्यावर पवारसाहेबांनी कामकाज केले, त्या खात्यामध्ये त्यांनी एक वेगळाच ठसा उमटवला. प्रशासनात एखादी चांगली व्यक्ती दिसली, तर तिला राजकारणात आणून त्यामार्फत चांगल्या पद्धतीची जनसेवा करून घेताना अनेक उदाहरणे आपल्याला दिसून आली आहेत. यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले अनेक जण पवारसाहेब आमचे ‘आयडॉल’ आहेत, असे ज्यावेळी सांगतात. त्या वेळी खऱ्या अर्थाने पवारसाहेबांची उंची व त्यांच्या कार्याची कार्यपद्धती वेगळे सांगण्याची गरज पडत नाही. शरद पवार यांना प्रत्येक खात्याविषयी माहिती असल्याने कोणतेही काम ज्यावेळेस त्यांच्याकडे दिले जाते. त्या वेळेस त्यात समाधानकारक उत्तर मिळते. प्रामुख्याने देशाचा सेवक म्हणून सीमेवर तैनात असलेला सैनिक असो किंवा शेतात राबून देशाची अन्नधान्याची गरज पूर्ण करणारा शेतकरी असो. या देशातील दोन्ही प्रमुख घटकांची अडचण दूर करण्यासाठी या दोन्ही घटकांची अडचण कायम सोडविण्यासाठी संबंधित विभागाचे मंत्रिपदही त्यांनी भूषवत तेथेही एक अनमोल कार्य करून ठेवले आहे, असे एकमेव उदाहरण शरद पवार यांच्या कार्यातून दिसते. 


लातूरचा भूकंप असो वा गुजरातचा, प्रत्येक ठिकाणी संकट हे देशावरील नसून ते आपल्यावरील आहे, असे मानून कामकाज केल्याची उदाहरणे आहे. लातूरला केलेल्या कामकाजाच्या जोरावर त्यांनी प्रशासनाला मार्गदर्शन केले. 
शेतीच्या बाबतीतही व्हीएसआय (वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूट) मध्ये पंतप्रधानांना प्रचारण करून साखरेच्या समस्या शासन तसेच प्रशासनाकडून सोडविण्यासाठी त्याचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. प्रशासनाच्या कोणत्याही कामकाजात अडचण येण्याच्या आत त्याच्यावरील उपाययोजना पवारसाहेब अधिकाऱ्यांना देतात. यामुळे कोणतेही समाजकार्य थांबत नाही. प्रशासन व शासन यांचा समन्वय कसा साधायचा, याचे कदाचित दुसरे उदाहरण शोधूनही सापडणार नाही.

दिंडोरी तालुक्यातून रात्रीच्या वेळी जात असतानाही रस्त्याच्या कडेला पडलेले दगड कशाचे आहेत, हे श्रीराम शेटे यांना विचारले असता हे दगड शेतकऱ्यांनी द्राक्षबागा लावण्यासाठी काढले आहेत, असे सांगताच यासाठीही आता शासन मदत करेल, असा तत्काळ शब्द देत त्यासाठी प्रशासनाला याबाबत अहवाल तयार करायला सांगून थेट केंद्रात योजना अमलात आणली, हे त्याच्या कार्याचे एक अद्वितीय उदाहरण आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला आमदारकीपासून थेट उपाध्यक्षपदापर्यंत दिलेला बहुमान हा माझ्या जीवनात ‘ना भूतो ना भविष्यती’ असा आहे, अशा या महान नेतृत्वाला महाराष्ट्रातील तमाम जनता व मतदारसंघातील नागरिकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com