"व्यापाऱ्यांनो, गाठ माझ्याशी आहे" IGP डॉ. प्रतापराव दिघावकर यांचा इशारा 

pratap dighavkar 1.jpg
pratap dighavkar 1.jpg

नाशिक / सटाणा : जे व्यापारी बळीराजाचे घामाचे पैसे बुडवतील, त्यांची गाठ माझ्याशी आहे. कायदेशीर जबाबदारीपेक्षाही नैतिक जबाबदारी मोठी समजून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे वसूल करून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी बुधवार (ता. २३) दिला. 

व्यापाऱ्यांनो, गाठ माझ्याशी आहे 
येथील राधाई मंगल कार्यालयात व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांच्या तक्रारींची दखल घेतल्यावर श्री. दिघावकर बोलत होते. तालुक्याचा सिंचनप्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडून २५ कोटी रुपयांचा निधी आणणार असून, जलसिंचनासाठी तालुक्यात ६०० भूमिगत बंधारे बांधून तालुका सुजलाम सुफलाम करण्याचा मनोदय डॉ. दिघावकर यांनी व्यक्त केला. 

तालुका सुजलाम सुफलामचा मनोदय 
बागलाण तालुक्यात व्यापाऱ्यांनी ६५ शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याच्या रीतसर तक्रारी दाखल आहेत. येत्या पंधरा दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांचे बुडीत पैसे मिळवून देण्यात येतील. व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे रामचंद्रबापू पाटील, माजी आमदार संजय चव्हाण, शंकरराव सावंत, मविप्र संस्थेचे उपसभापती राघो अहिरे, डॉ. विलास बच्छाव, खेमराज कोर, मालेगावचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. 

विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांचा इशारा 
दिघावकर यांनी, सटाणा महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राने स्पर्धा परीक्षांमध्ये ‘बागलाण पॅटर्न’ म्हणून आदर्श निर्माण करावा, असे आवाहन केले. बागलाण तालुका पत्रकार संघाने श्री. दिघावकर यांचा सत्कार केला. ज. ल. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी नानाजी दळवी, यशवंत पाटील, यशवंत अहिरे, खंडेराव शेवाळे, कृष्णा भामरे, पोपट अहिरे, सुधाकर पाटील, यशवंत पाटील, कृष्णा रौंदळ, दुर्जन पवार, जे. के. सोनवणे, प्रा. शांताराम गुंजाळ, प्रकाश निकम, चंद्रकांत पवार, रोहिदास जाधव आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

पोलिस अधिकाऱ्यांची आढावा बैठक

दरम्यान, दिघावकर यांनी सकाळी सटाणा नगर परिषदेस भेट दिल्यानंतर नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासोबत त्यांनी विंचूर-प्रकाशा वळण रस्त्याची पाहणी केली. बसस्थानकाजवळ विजयराज वाघ मित्रमंडळाने त्यांचे स्वागत केले. या वेळी विजय वाघ, लालचंद सोनवणे, फईम शेख, पंडितराव अहिरे, शरद शेवाळे आदी उपस्थित होते. येथील पोलिस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी केली. पोलिस ठाणे आवारातील देवमामलेदार यशवंतराव महाराज कक्षाच्या उद्‍घाटनाचा मान त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांना दिला. पंचायत समिती सभागृहात पोलिस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. 


सटाणा : शेतकऱ्यांशी बोलताना विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर. समोर उपस्थित पोलिस अधीक्षक संदीप घुगे, रामचंद्रबापू पाटील, माजी आमदार संजय चव्हाण, राघो अहिरे, डॉ. विलास बच्छाव आदींसह शेतकरी.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com