ब्रेकिंग : दि बर्निंग बसचा थरार! मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ एसटी बसने घेतला पेट; पाहा PHOTOS

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ एसटी बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली.  राहुड घाटात धावत्या एसटी बसने पेट घेतला असल्याची माहिती समोर येतेय. मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जाताना घटना घडली आहे.

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ एसटी बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली.  राहुड घाटात धावत्या एसटी बसने पेट घेतला असल्याची माहिती समोर येतेय. मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जाताना घटना घडली आहे.

Image

दि बर्निंग बसचा थरार! 

आगीने बसला पेट घेतल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला. चालकाने तात्काळ बस थांबवत सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यानं जीवितहानी टळल. मात्र आगीत एसटी बसचं मोठं नुकसान झाले आहे. उच्च तापमानामुळे बसने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यात दलाला यश आले आहे. चांदवड पोलीस घटनास्थळी असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Image

हेही वाचा > आता नाशिक-मुंबई प्रवास केवळ अडीच तासांवर! उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना 

Image

हेही वाचा > आठशे सीसीटीव्हीतून शहर नजरेच्या एकाच टप्प्यात! कमांड कंट्रोल सेंटर सज्ज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST bus caught fire near Chandwad on Mumbai-Agra highway nashik marathi news