VIDEO : 'व्यवसाय लॉकडाऊनमुक्त करा'; जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनची एकमुखी मागणी

decorators andolan.jpg
decorators andolan.jpg

नाशिक : मंडप डेकोरेटर्स आणि त्यांच्याशी संलग्न व्यावायिकांच्या वतीने सोमवारी (ता. 2) राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आले. नाशकातही जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनच्या वतीने गोल्फ क्लब मैदानानजिक धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनास मोठा प्रतिसाद लाभला.

व्यवसाय तत्काळ लॉकडाऊनमुक्त करा...

गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे मंडप डेकोरेटर्स आणि संबंधित व्यवसाय आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहे. याचा जिल्ह्यातील हजारो कुंबियांना फटका बसला आहे. ही आर्थिक विपन्नता दूर करण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व व्यवसाय तत्काळ लॉकडाऊनमुक्त करण्यात यावेत, अशी एकमुखी मागणी आज सोमवारी (ता. 2) रोजी करण्यात आली. 
आपल्या मागण्यांबाबत सरकारला जाग आणण्यासाठी असोसिएशनने हे पाऊल उचलले. या आंदोलनात नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह या संघटनेशी संलग्न असलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट, एलईडी वॉल, डीजे साऊंड, लाईट, फ्लॉवर डेकोरेटर्स, छायाचित्रकार, केटरर्स, घोडाबग्गी, ऑर्केस्ट्रा, बॅण्डवादक, स्वागत ग्रुप, वेटर, फेटेवाले, जनरेटर आदी व्यावसायिक संघटनांनी सहभाग नोंदवला. आंदोलनप्रसंगी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

नागरिकांचे लक्ष वेधले...

आंदोलनाच्या माध्यमातून सर्व व्यावसायिक संघटनांचे सदस्य व्यवसायाअभावी आर्थिक विपन्नावस्थेत गेले असून त्यांना केवळ बिगीन अगेन मोहिमेअंतर्गत पुन्हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्याचे जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष केशव डिंगोरे यांनी सांगितले. सहभागी झालेल्या असंख्य आंदोलकांनी पांढरा शर्ट परिधान केला होता. तसेच सोबत काळ्या रंगाची छत्री आणली होती. या दोन्ही बाबी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com