शेतकऱ्यांवर कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ! लॉकडाउनमुळे मोठा फटका

stored onion increased loss of farmer nashik marathi news
stored onion increased loss of farmer nashik marathi news

नाशिक / अंबासन : राज्यात कांदा उत्पादनात आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यात या वर्षी २०१९-२० मध्ये सर्वाधिक (४१.३० लाख टन) कांदा उत्पन्न झाले, तर ३० ते ३५ टक्के कांदा चाळीत शिल्लक असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. मात्र कांद्याचा भाव वाढेल या आशेवर साठवण केलेला कांदा चाळीतच सडू लागल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. यामुळे ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच खराब झाला त्यांच्या नुकसानीत दीडपटीने भर पडल्याचे बोलले जात आहे. 

लॉकडाउनमुळे मोठा फटका 
तरसाळी (ता. बागलाण) येथील अल्पभूधारक कांदा उत्पादक शेतकरी उत्तम रौंदळ यांनी चार एकर क्षेत्रात कांदालागवड केली होती. तरसाळी शिवारात दीड एकरात सात ट्रॉली व वनोली शिवारात अडीच एकरांवर १६ ट्रॉली कांदा घेतला होता. कांदालागवडीसाठी श्री. रौंदळ यांनी सात हजार रुपये पायलीप्रमाणे तीन पायली कांदा बियाणे घेऊन उळे तयार करून लागवड केली. पुढील काळात भाव वाढतील या अपेक्षेने घराजवळच्या चाळीत १६ ट्रॉली कांदा साठवण केली, तर एका शेतकऱ्याकडून भाडेत्त्वावरील कांदा चाळीत साठवून ठेवला होता. कांदालागवडीसाठी बँकेचे कर्ज व हातउसनवार उचल घेतली आहे. साठवणक्षमता हरवून बसलेल्या कांद्याला यंदा लॉकडाउनमुळे मोठा फटका बसला. 

कांद्याला फुटले कोंब 
कांदा विक्रीची साखळी तुटली. श्री. रौंदळ यांनी याही परिस्थितीत कांदा विक्रीचा निर्णय घेतला. सात ट्रॉली साठवण केलेला कांदा चाळीतच सडू लागल्याने प्रतवारी केल्यानंतर सहा ट्रॉली कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. वीरगाव येथील युवा शेतकरी गोरख बच्छाव यांच्याही चाळीतील कांदा चाळीतच सडू लागल्याने कांद्याला कोंब फुटले आहेत. 

मजूरी घरातून दिली 
डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे. सात ट्रॉलींतून एकच ट्रॉली हाती लागली. चाळीत सडलेला कांदा उकिरड्यावर फेकण्यासाठी घरातून मजुरी द्यावी लागल्याचे तरसाळी येथील कांदा उत्पादक शेतकरी 
उत्तम रौंदळ यांनी सांगितले. 
(संपादन : भीमराव चव्हाण) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com