शासकीय रुग्णालये सशक्त करा; पालकमंत्री छगन भुजबळ यांचे लासलगावात निर्देश 

chhagan bhujbal lasalgaoan
chhagan bhujbal lasalgaoan

 नाशिक/लासलगाव : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी शासनाकडून सर्व प्रकारे प्रयत्न होत आहेत. या आपत्तीला इष्टापत्ती समजून शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून कोरोनाचे रुग्ण बरे करण्यासोबतच रुग्णालयाचे सशक्तीकरण करा; सर्व शासकीय रुग्णालयांत मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. 

पालकमंत्री भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना आणि विविध विकासकामे यांच्या पार्श्वभूमीवर येवला आणि निफाड तालुक्याची आढावा बैठक लासलगाव येथे झाली. या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार दिलीप बनकर, आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनंत पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दावल साळवे, येवला प्रांताधिकारी सोपान कासार, निफाड उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, मनमाड पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे, येवला तहसीलदार प्रमोद हिले, निफाड तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, डॉ. संदीप कराड, मजीप्र कार्यकारी अभियंता सुजित मोरे, स्थानिक स्तर कार्यकारी अभियंता प्रवीण खेडकर, खैरनार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनाग्रा, सहाय्यक अभियंता महेश पाटील, उपअभियंता देवरे, उन्मेष पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता आव्हाड, उपअभियंता सोनवणे, येवला पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यवंशी, येवला तालुका आरोग्याधिकारी हितेंद्र गायकवाड, निफाड तालुका आरोग्याधिकारी चेतन काळे, सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे, एकनाथ पाटील, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, पोलिस निरीक्षक संदीप कोळी, खंडेराव रंजवे उपस्थित होते. 


पंचनाम्यांसाठी अधिकारी जबाबदार 

येवला व निफाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनास द्यावा, राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांची जाहीर केलेली मदत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळवून द्यावी. पंचनाम्याअभावी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना जर मदत मिळाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील जे रस्ते जास्त खराब झाले त्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून रस्त्यांचे प्रश्न सोडवावेत. विद्युत विभागानेही शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. सोळागाव पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्रालयीन स्तरावरील बैठकीतील मुद्द्यांची माहिती या वेळी त्यांनी दिली. तसेच येवला व निफाड तालुक्यांतील नागरिकांचे प्रश्न समजून घेत अधिकाऱ्यांना सर्व प्रश्नांचे निराकरण करण्याचे आदेश दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com