दीपक शिरसाठच्या ‘उद्योगा’मुळे प्रशासन हादरले; ‘एचएएल’मध्ये बैठकांचा धडाका सुरू

दिपक खैरनार
Sunday, 11 October 2020

शिरसाठला शुक्रवारी अटक करण्यात आल्यानंतर शनिवारी (ता. १०) एचएएल परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कर्मचाऱ्यांना मोबाईल नेण्यास देखील मज्जाव करण्यात आला. दरम्यान, सोमवारी दिवसभर व्यवस्थापनाच्या बैठकांचा धडाका सुरू होता. 

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ला एचएएलमधील गोपनीय माहिती पुरविणाऱ्या दीपक शिरसाठच्या ‘उद्योगा’मुळे एचएएल प्रशासन चांगलेच हादरले आहे. शिरसाठला शुक्रवारी अटक करण्यात आल्यानंतर शनिवारी (ता. १०) एचएएल परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कर्मचाऱ्यांना मोबाईल नेण्यास देखील मज्जाव करण्यात आला. दरम्यान, सोमवारी दिवसभर व्यवस्थापनाच्या बैठकांचा धडाका सुरू होता. 

हेरगिरीच्या पार्श्‍वभूमीवर कडक बंदोबस्त

बैठका आणि कडक बंदोबस्तामुळे परिसरात मात्र तणावपूर्ण शांतता होती. पाकिस्तानचा खबरीलाल झालेल्या शिरसाठच्या हेरगिरीने एचएएल व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांमध्ये खबळबळ उडाली होती. एचएएलमधील कामकाज आज नियमित सुरू होते. पण, नेमकी कोणती माहिती पाकिस्तानला पोचली, याची धाकधुक कर्मचाऱ्यांमध्ये दिसत होती. त्याचवेळी व्यवस्थापनाकडून दिवसभर बैठका सुरू होत्या. त्यानंतर एटीएस पथकाने एचएएल व्यवस्थापनाकडून काही माहिती मागविल्याचे समजते. एरवी प्रतिबंधित क्षेत्रात सर्रास मोबाईलचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज मोबाईल वापरावर निर्बंध घालण्यात आले होते. 

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

दीपक शिरसाठ प्रकरणानंतर एचएएलमधील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क ठेवण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना मोबाईल वापरास निर्बंधासह आणखी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एटीएस पथकानेही काही माहिती आज मागविली. ती पुरविण्यात आली आहे. - अनिल वैद्य, महाप्रबंधक, एचएएल  

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strict security in the background of espionage in HAL nashik marathi news