ह्रदयद्रावक! आईला न सांगताच 'तो' एकटाच गेला विहिरीवर...रात्रभर शोध घेतला तर माऊलीला धक्काच..आक्रोश..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

यश हा पोहण्यासाठी न सांगता एकटाच गेल्याने सायंकाळी आईने यश घरी न परतल्याने गावात शोधा शोध सुरु केली. मात्र यश गावात कुठेही सापडला नाही संपुर्ण रात्र यशच्या मातोश्री सुरेखा उगले या रात्रभर जागीच होत्या. एकुलता एक मुलगा असल्याने त्यांना यशची चिंता वाढु लागली. त्यानंतर जे काही घडले ते ह्रदय पिळवटून टाकणारे होते.

नाशिक / लखमापूर : यश हा पोहण्यासाठी न सांगता एकटाच गेल्याने सायंकाळी आईने यश घरी न परतल्याने गावात शोधा शोध सुरु केली. माञ यश गावात कुठेही सापडला नाही संपुर्ण रात्र यशच्या मातोश्री सुरेखा उगले या रात्रभर जागीच होत्या. एकुलता एक मुलगा असल्याने त्यांना यशची चिंता वाढु लागली. त्यानंतर जे काही घडले ते ह्रदय पिळवटून टाकणारे होते.

मुलाची चिंता.. संपुर्ण रात्र आईने जागून काढली

लखमापूर तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील रहिवासी व दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये  इयत्ता ८ वी मध्ये शिकणारा यश कांतिलाल उगले (१४) हा तळेगांव दिंडोरी बिरोबा येथील विहिरीवर पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याने गावांत हळहळ व्यक्त केली जात आहे. यश हा पोहण्यासाठी न सांगता एकटाच गेल्याने सायंकाळी आईने यश घरी न परतल्याने गावात शोधा शोध सुरु केली. मात्र यश गावात कुठेही सापडला नाही संपुर्ण रात्र यशच्या मातोश्री सुरेखा उगले या राञभर जागीच होत्या. एकुलता एक मुलगा असल्याने त्यांना यशची चिंता वाढु लागली. माञ सकाळी यश विहिरीकडे जाताना दिसला होता अशी कुणकुण कानी लागताच गावातील नागरिक बिरोबा येथील विहिरी जवळ गेले माञ यशला विहिरीच्या पाण्यात शोधणार कोण यासाठी पिंपळगाव केतकी येथील पट्टीचे पोहणार रामदास या व्यक्तिला पाचारण करण्यात आले.

हेही वाचा > पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर सरपंचावर कोरोनाची मेहेरबानी...की आणखी काही? संशय कायम

शोधायला गेले अन् मृतदेहच बाहेर घेऊन आले

रामदास यांनी पहिल्याच डुबकी मध्ये यशचा मृतदेह वरती घेऊन आले. या अगोदरही तळेगाव येथे अशीच एक घटना घडली होती त्या वेळेस ही रामदास यांनीच मृतदेह पाण्याबाहेर काढुन दिला होता. रामदास सांगतात की हे काम पुण्याचे आहे म्हणुन तर मी करतो माझ्या सारख्या पट्टीच्या पोहनाऱ्या नागरिकांनीही पाण्यात बुडालेल्या नागरिकांना पाण्याबाहेर काढणे असे काम करावे. यश च्या  मृत्यूबाबत गावांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा > दिलासादायक! नाशिक शहरात कोरोनाला लागतोय "ब्रेक'...ही आहेत कारणे.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students drowned in well at Talegaon Dindori nashik marathi news