प्रेरणादायी! दिव्यांगत्वावर मात करत घेतली गगनभरारी; उंच इमारतींवर करतात वेल्डिंग

success story of disabled maruti shinde nashik marathi news
success story of disabled maruti shinde nashik marathi news

नाशिक/ घोटी : दिव्यांगत्वावर मात करत गगनभरारी घेणारे दिव्यांग, शरीर साथ देत नसतानाही समाजात उत्तुंग अशा विविध क्षेत्रांत आपले कसब पणाला लावत आहेत. सामाजिकदृष्ट्या अनेक अडचणींवर मात करत अपयशाने खचून न जाता, जन्मताच ६५ टक्के दिव्यांग असलेल्या दौंडत (ता. इगतपुरी) येथील मारुती शिंदे या अवलियाने वेल्डिंगच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करून दाखवून दिले आहे. 

डोंबिवली शहरात एका वेल्डिंगच्या दुकानात चार वर्ष काम शिकताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वेल्डिंग अनेक प्रकारच्या असतात. त्यात मी इलेक्ट्रिक (इलेक्ट्रिकल) काम शिकलो. यामध्ये घरगुती उपकरणांपासून ते उंच उंच इमारतींवर काम करण्याची संधी मिळाली. यातूनच गुणवत्तेचे ज्ञान व ग्राहकांना आत्मसात करण्याची कला अवगत झाली. मग स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. शहरात वेल्डिंगचे कसब शिकल्याने व कामात काटेकोरपणा पाळल्याने ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

अनेकांना रोजगार मिळवून दिला

पुढे नाशिक, घोटी, इगतपुरी, भंडारदरा आदी शहरांत व गोंदे, अंबड औद्योगिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत गेली. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सोबत घेत अनेक कंपन्यांचे शेड, गेट, वाहनांची बॉडी बांधणे आदी तयार करण्याचे काम करत व्यवसायात गेल्या वीस वर्षांत वेल्डिंग व्यवसायात अनेकांना रोजगार मिळवून दिला, तर काहींना कारागीर बनविले. 


दिव्यांग असल्याने काही मर्यादा येतात; मात्र त्याकडे दुर्लक्ष करत लढण्याची मानसिकता मी तयार केली. वेल्डिंगचे काम धोक्याचे असले तरी सुरक्षितता आपल्या हातात आहे. अनेक शहरांत व ग्रामीण भागात काम करत असताना लोक कुतूहलाने पाहतात. या कामातून वार्षिक दोन ते तीन लाखांचं उत्पन्न मला मिळते. 
-मारुती शिंदे, दिव्यांग वेल्डिंग कारागीर

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com