PHOTO : जन्मतःच व्यंग चिमुकलीच्या आयुष्यात 'चमत्कार'! पालक आश्चर्यचकित!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

नाशिक  : कळवण येथील संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या माहेश्‍वरी कोळी या दोनवर्षीय बालिकेच्या दोन्ही पायांना जन्मतःच व्यंग होते. त्यामुळे तिच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. दोन्ही पायांना व्यंग असल्याने पालकांनाही चिंता सतावत होती.

बालिकेच्या स्वप्नांना मिळणार उभारी

नाशिक  : कळवण येथील संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या माहेश्‍वरी कोळी या दोनवर्षीय बालिकेच्या दोन्ही पायांना जन्मतःच व्यंग होते. त्यामुळे तिच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. दोन्ही पायांना व्यंग असल्याने पालकांनाही चिंता सतावत होती.

बालिकेच्या स्वप्नांना मिळणार उभारी

कळवण येथील संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या माहेश्‍वरी कोळी या दोनवर्षीय बालिकेच्या दोन्ही पायांना जन्मतःच व्यंग होते. त्यामुळे तिच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. दोन्ही पायांना व्यंग असल्याने पालकांनाही चिंता सतावत होती. योगायोगाने कळवण उपजिल्हा रुग्णालयात शासनाच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आयोजित संदर्भसेवा शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपक बहिरम यांनी माहेश्‍वरीची तपासणी केली. त्या वेळीच तिच्या पायांवर उपचार करण्याचा निर्णय झाला.जन्मापासून दोन्ही पायांना असलेले व्यंग डॉक्‍टरांच्या यशस्वी उपचारांनंतर दूर झाल्याने दोन वर्षीय बालिकेच्या पायांना बळ मिळाले आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत या बालिकेवर उपचार होऊन तिचे पाय सरळ झाल्याने या बालिकेच्या स्वप्नांना उभारी मिळणार आहे. 

Image may contain: 1 person, standing and sitting

VIDEO : ह्रदयद्रावक! पतंगामागे धावत होता चिमुकला...ऐन मकरसंक्रांतीलाच आक्रोश..

पालकांनीही आनंद व्यक्त करत डॉक्‍टरांचे आभार

पुढील उपचारांसाठी तिला नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश शेलार, मरियम काझी यांनी बालिकेच्या व्यंग असलेल्या दोन्ही पायांवर यशस्वीरीत्या उपचार करून तिचे पाय सरळ केले. या उपचाराला प्रतिसाद मिळाल्यामुळे व माहेश्‍वरीचे पाय सरळ झाल्याने तिच्या पालकांनीही आनंद व्यक्त करत डॉक्‍टरांचे आभार मानले. 

हेही वाचा > लॉटरी लागल्याचा आनंदच आनंद...अन् क्षणात दु:खाचा डोंगर...

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कळवणला यशस्वी उपचार 
राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम हा आदिवासी व दुर्गम भागातील बालकांसाठी वरदान ठरत असून, जन्मजात व्यंग (क्‍लब फूट) असलेल्या माहेश्‍वरीच्या दोन्ही पायांवर या योजनेंतर्गत यशस्वीरीत्या उपचार होऊन ती स्वत:च्या पायांवर चालू लागल्याने मनस्वी आनंद होत आहे. अशा प्रकारचे व्यंग असलेल्या मुलांच्या पालकांनी योजनेचा लाभ घ्यावा. - वैभव काकुळते, औषधनिर्माण अधिकारी, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम,उपजिल्हा रुग्णालय, कळवण 

माहेश्‍वरीच्या दोन्ही पायांत व्यंग असल्याने तिच्या भवितव्याची काळजी सतावत होती, परंतु वैभव काकुळते यांनी या योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रियेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करून पुढाकार घेतला. माझ्या मुलीच्या भविष्याचा प्रश्‍न सोडविला याबद्दल त्यांची शतशः ऋणी आहे. तसेच उपचार करणाऱ्या सर्व डॉक्‍टरांचे आभार. - मनीषा कोळी, माहेश्‍वरीची आई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: successfull legs surgery of girl in kalwan Nashik Marathi News