esakal | उसाच्या फडातही शोधला दिवाळीचा आनंद! ढोर मेहनत, पोटाची आग मात्र कायम
sakal

बोलून बातमी शोधा

saykheda poor people.jpg

कसली दिवाळी आणि कसली भाऊबीज.. फक्त काम आणि काम हेच त्यांच्या भाळी लिहिलेलं.काही समाजसेवी मित्रांनी थोड्याफार प्रमाणात मिठाई वाटप करत त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधला हे विशेष.

उसाच्या फडातही शोधला दिवाळीचा आनंद! ढोर मेहनत, पोटाची आग मात्र कायम

sakal_logo
By
संजय भागवत

सायखेडा(नाशिक) : दिपावलीचा सण म्हणजे आनंदाचा सण.. नवे कपडे गोडधोड आणि सोबत फटाके अशी साजरी करतात.पण काही जण दिवाळीतही पोटाची आग विझविण्यासाठी ढोर मेहनत करतात. त्यांच्या दिवाळीचा सण घामात विरून जातो.

मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात दिवाळी विसावली.
ऊसतोड कामगार पोटाची गळगी भरण्यासाठी गोदाकाठ परिसरात स्थिरावला.सगळीकङे दिवाळी भाऊबीज साजरी होत असतांना यांची दिवाळी मात्र गावापासून घरापासून दूर उसाच्या फडात घामांच्या धारात विरून गेली.
लहान मुलं फटाके पासून दूर चिपाटाच्या आवाजातच आनंद घेत गेली.
सगळीकडे दिवाळीचा उत्साह असताना यांच्या घरात मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात दिवाळी विसावली.

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

फक्त काम आणि काम हेच त्यांच्या भाळी लिहिलेलं..
बाहेर फटाके वाजत असतांना फटक्यांच्या आवाज ऐकत यांची मुलं फटाक्यांचा उजेड ङोळ्यात साठवत बसली. कसली दिवाळी आणि कसली भाऊबीज फक्त काम आणि काम हेच त्यांच्या भाळी लिहिलेलं.काही समाजसेवी मित्रांनी थोड्याफार प्रमाणात मिठाई वाटप करत त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधला हे विशेष.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला