"ती" खरी पोलीसांकडे दाद मागायला गेली...याउलट पोलीसांनीच..

woman domestic violence 1.jpg
woman domestic violence 1.jpg

नाशिक : सायखेडा पोलिसांत विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेले इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ व सहाय्यक निरीक्षकांवर कारवाईचे संकेत पोलिस उपायुक्तांनी दिले. या प्रकरणाशी संबंधित सखोल माहिती घेतल्यानंतर त्याचा अहवाल पोलिस आयुक्तांना देण्यात येणार आहे. 

अत्याचाराबाबत तिने पोलिसांकडे दाद मागितली होती...

इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेने तिच्यावरील अत्याचाराबाबत इंदिरानगर पोलिसांत दाद मागितली होती. तेव्हा वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण, सहाय्यक निरीक्षक जगताप यांनी वेळकाढूपणा केला. त्या मुळे तिने चांदोरी येथे गोदापात्रात उडी घेत आत्महत्या केली. तिने लिहिलेल्या चिठ्ठीत दोन पोलिस अधिकाऱ्यांसह पती साहेबराव जगधने, दिलीप जाधव यांना मृत्यूला जबाबदार धरले आहे. त्यानुसार, सायखेडा पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. 

तपशीलवार चौकशी व प्रत्यक्ष कागदपत्रांची पाहणी करणार

वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण काही दिवसांपासून रजेवर आहेत. तर याबाबत पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी या घटनेची माहिती मागविली आहे. ज्या वेळी विवाहितेने इंदिरानगर पोलिसांकडे दाद मागितली आणि प्रत्यक्ष कारवाई होण्यास लागलेला विलंब याबाबतची तपशीलवार चौकशी व प्रत्यक्ष कागदपत्रांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याबाबतचा अहवाल तयार करून पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांना सादर केला जाणार आहे. त्यामध्ये त्रुटी वा कर्तव्यात निष्काळजी आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

त्यासंदर्भातील माहिती मागविली आहे
आज बंदोबस्त असल्याने माहिती घेता आलेली नाही. मात्र त्यासंदर्भातील माहिती मागविली आहे. ती पाहिल्यानंतर त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. - विजय खरात, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com