धक्कादायक! स्वत:च्याच गाडीत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या...कुटुंबियांचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

शहरातील किराणा माल सप्लायर अविवाहित तरुण व्यावसायिकाने आपल्या स्वःताच्या गाडीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री खूप वेळ वाट बघूनही तो घरी न परतल्याने शोधाशोध सुरु केली असता संबंधित धक्कादायक घटना समोर आली.

नाशिक : (पेठ) शहरातील किराणा माल सप्लायर अविवाहित तरुण व्यावसायिकाने आपल्या स्वःताच्या गाडीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री खूप वेळ वाट बघूनही तो घरी न परतल्याने शोधाशोध सुरु केली असता संबंधित धक्कादायक घटना समोर आली.

अशी आहे घटना

पेठ येथील तरुण वैभव उर्फ भैय्या बाळासाहेब शिरसाठ (वय. 25, रा. पेठ) हे शहरातील विविध दुकानाचे मालक नाशिक येथून आपल्या दुकानांसाठी माल खरेदी करतात. तो माल वैभव आपला टेम्पो आयशर क्रमांक MH-04 EY 3388 या गाडीने नाशिक येथून वाहतुक करुन पेठ येथे वेगवेगळ्या दुकानात वितरित करण्याचा व्यवसाय करीत असे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमी पेठ शहरातील बाजारापेठ सह सर्व दुकानांनी स्वंयस्फूर्ती पाच दिवसाचा लॉकडाऊन कडक जाहिर केल्याने सर्वत्र शुकशुकाट असतांना शनिवारी (ता. 27) सायंकाळी 6 वाजेदरम्यान आपला आयशर टेम्पो घेऊन पेठ -बलसाडकडे निघाला. रात्री सुमारे साडेसात वाजेपर्यत घरातील सर्वजण वैभवची वाट बघत त्याला फोनवर संपर्क करीत होते . मात्र फोन वाजत असतांना फोन उचलत नाही त्यामुळे शोधाशोध सुरु झाली. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

त्यावेळी वांगणी शिवारात रस्त्याच्याकडेला गाडी उभी केलेली आढळली. तिथे जाऊन बघितले असता आयशर गाडीतील लोखंडी ऍगलं माल बांधण्याच्या दोराने गळफास घेतलेल्या अवस्थेत वैभव आढळून आला. याबाबत रविंद्र करवंदे (पेठ) यांनी पेठ पोलीस स्टेशनला खबर दिली. याबाबत पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार पाटील करीत आहेत.

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide by strangulation of youth in Pethe city nashik marathi news