प्रमोद कुठेच दिसत नाही.. अन् पहाटेच्या सुमारासच आजीबाईला बसला धक्का

shirwade pramod.jpg
shirwade pramod.jpg

नाशिक / निफाड : प्रभावतीनगर या आदिवासी वस्तीत विमल सोपान सोनवणे या आई व दोन मुलांसह राहतात. सोमवारी पहाटेच्या सुमारास आजी आशाबाई माळी या त्यांचा नातू प्रमोद कुठेच दिसत नाही म्हणून पाहिले..तर ते निश्चितच धक्कादायक होते.

प्रमोद कुठेच दिसत नाही.. पहाटेच्या सुमारासच आजीला बसला धक्का
तालुक्‍याच्या शिरवाडे वाकद येथील प्रभावतीनगर या आदिवासी वस्तीत विमल सोपान सोनवणे या आई व दोन मुलांसह राहतात. सोमवारी पहाटेच्या सुमारास मृताच्या आजी आशाबाई माळी यांच्या प्रमोदने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तातडीने पोलिसपाटील यांना कळविले. पोलिसपाटील रामनाथ तनपुरे यांनी लासलगाव पोलिस ठाण्याला खबर दिली. त्यांच्या खबरीवरून लासलगाव पोलिस ठाण्याला आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात

येथील प्रमोद सोपान सोनवणे या 19 वर्षीय युवकाने सोमवारी (ता. 13) पहाटेच्या सुमारास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावर लासलगावचे पोलिस शिपाई इरफान शहा, एस. एस. इप्पर, पोलिस शिपाई दत्तात्रय कोळपे यांनी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी निफाडच्या सरकारी रुग्णालयात पाठविला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com