मालेगावात आता नव्या "सिंघमची' एंट्री! कोरोनावर मात करण्यासाठी शासनाचं मोठं पाऊल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

मालेगावात कायदा बंदोबस्त अबाधित ठेवण्याची कडासने यांना जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील कडासने यांनी या अगोदर मालेगावात अप्पर पोलीस अधीक्षक पदावर काम केलं असून त्यावेळी त्यांनी पोलीस आणि नागरिक यांच्यातील असलेला दुरावा कमी करून पोलीस हे आपले मित्र आहे अशी भावना शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण केली होती. उर्दू आणि अरबी भाषेचं चांगलं ज्ञान कडासने यांना असल्यानं मालेगावातील नागरिकांमध्ये विशेषतः मुस्लिम समाजात त्यांना वेगळे व मानाचं स्थान आहे. इतर सर्व समाजातदेखील त्यांचं आदर व आपुलकीचं नातं आहे.

नाशिक / मालेगाव : सध्या मालेगावात कोरोनाचा उद्रेक वाढतच चाललायं. अशातच रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून त्यात पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळे ही परिस्थिती आणखी बिकट होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मालेगावची हाताबाहेर जात असलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनानं आणखी एक पाऊल उचलत न लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची मालेगावला केली नियुक्ती आहे. याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी आदेश काढला आहे.

कडासनेंना उर्दू आणि अरबी भाषेचं चांगलं ज्ञान 

मालेगावात कायदा बंदोबस्त अबाधित ठेवण्याची कडासने यांना जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील कडासने यांनी या अगोदर मालेगावात अप्पर पोलीस अधीक्षक पदावर काम केलं असून त्यावेळी त्यांनी पोलीस आणि नागरिक यांच्यातील असलेला दुरावा कमी करून पोलीस हे आपले मित्र आहे अशी भावना शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण केली होती. उर्दू आणि अरबी भाषेचं चांगलं ज्ञान कडासने यांना असल्यानं मालेगावातील नागरिकांमध्ये विशेषतः मुस्लिम समाजात त्यांना वेगळे व मानाचं स्थान आहे. इतर सर्व समाजातदेखील त्यांचं आदर व आपुलकीचं नातं आहे.

हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

एक चांगला अधिकारी, सर्वसामान्यतः मिसळणारा अधिकारी, वेळ प्रसंगी कठोर निर्णय घेणारा अधिकारी अशी प्रतिमा त्यांची असून मालेगावात तर आदरयुक्त त्यांचा दरारा आहे. कदाचित याची दखल घेऊन शासनानं त्यांना मालेगावातील कायदा बंदोबस्त अबाधित ठेवण्याची जबाबदारी दिली असावी असं बोललं जात आहे.

हेही वाचा > "चहापाणी घ्या पण आम्हाला जाऊ द्या साहेब! कारमधील चौघांनी दाखवले पोलीसांना आमिष..अन् झाला मोठा खुलासा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Kadasane has been given the responsibility of maintaining law and order in Malegaon nashik marathi news