PHOTOS : जेव्हा सुर्यकिरण करतात आई सप्तशृंगीचे पदस्पर्श...मनोहारी दृश्य!

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 January 2020

उत्तर महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या सप्तश्रृंगी गडावर आदिमाया सप्तश्रृंगी मातेच्या धनुर्मास उत्सव १७ डिसेंबर २०१९ पासून सुरु आहे. धनुर्मासात येणाऱ्या प्रत्येक रविवारी आदिमायेची पहाटे पाच वाजेपासूनच (सुर्यादयापूर्वी) पंचामृत महापुजेस प्रांरभ केला जातो. रविवारी पंचामृत महापुजा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्येे यांनी कुटुंबीयासमवेत केली. सकाळ सात वाजून दहा मिनिटांनी सुर्यादय होऊन सुर्यकिरणे आदिमायेच्या मूर्तीवर पडताच आदिमायेची महाआरती संपन्न झाली.

नाशिक  :  धनुर्मासातील (ता. ५) तिसऱ्या रविवारी सकाळी सुर्यकिरण देवीच्या मुर्तीवर पडताच 'आई अंबे की जय, सप्तश्रृंगी माते की जय' चा जयघोषाने अवघा सप्तश्रृंगी गड निनादून गेला. आदिमायेच्या धनुर्मास उत्सवा बरोबरच शाकंबरी नवरात्रोत्सव सुरु असून धनुर्मास उत्सव, शांकबरी नवरात्रोत्सव व रविवारची सुट्टी असा त्रिवेेणी योग साधीत भगवतीच्या चरणी साठ हजारावर भाविक नतमस्तक झाले.

सुर्यकिरणे थेट आदिमायेच्या मूर्तीवर.. 

उत्तर महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या सप्तश्रृंगी गडावर आदिमाया सप्तश्रृंगी मातेच्या धनुर्मास उत्सव १७ डिसेंबर २०१९ पासून सुरु आहे. धनुर्मासात येणाऱ्या प्रत्येक रविवारी आदिमायेची पहाटे पाच वाजेपासूनच (सुर्यादयापूर्वी) पंचामृत महापुजेस प्रांरभ केला जातो. रविवारी पंचामृत महापुजा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्येे यांनी कुटुंबीयासमवेत केली. सकाळ सात वाजून दहा मिनिटांनी सुर्यादय होऊन सुर्यकिरणे आदिमायेच्या मूर्तीवर पडताच आदिमायेची महाआरती संपन्न झाली.

सप्तशृंगी गड  : आदिमायेच्या धनुर्मास उत्सव व शाकंबरी नवरात्रोत्सव निमित्त आदिमायेच्या मूर्तीवर सुर्य किरण पडताच आदिमायेची आरती संपन्न झाली.

शाकंबरी नवरात्रोत्सवात मातेची पूजा-अर्चना

दरम्यान आदिमायेच्या शाकंबरी नवरात्रोत्सवासही शुक्रवार, (ता. ३) जानेवारी पासून सुरुवात झाली असून नववर्षातील पहिला रविवार व नाताळाच्या सुट्टीचा अखेरचा दिवस यामुळे गडावर आज पहाटेच्या गुलाबी थंडीतच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. त्यामुळे आदिमायेच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. फेनिक्युलर रोपवेने मंदीरात जाण्यासाठीही भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मंदीरात जाण्यासाठी अर्धा ते एक तास भाविकांना लागत होता. पायरी रस्त्यानेही भाविकांची भाविकांची बऱ्यापैकी गर्दी होती.

Image may contain: 2 people, people standing

देवीच्या दर्शनासाठी फेनिक्युलर ट्रॉलीने जाण्यासाठी झालेली भाविकांची गर्दी...

हेही वाचा > दहा वर्षाच्या मुलांचा धक्कादायक प्रकार...पोलिसांसह पालकही चक्रावले..​

हेही वाचा > भयावह! बाईकवरून सुसाट जाताना..अचानक बाजूच्या धावत्या कारचा दरवाजा उघडला...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunrays touch Godess Saptshringi at Vani Nashik Marathi News