'हौसले बुलंद' ठेवणाऱ्या "लेडी सिंघमचं" काम भावलं...सुप्रिया सुळेंकडून ट्विटरद्वारे गोड कौतुक!

हर्षल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

कोरोनाविरोधातील लढाईत स्वतःच्या विभागाचे ३ पोलीस शहीद झाले असतांना सुद्धा अनेक भावनिक करून टाकणाऱ्या प्रसंगांना तोंड देत 'हौसले बुलंद' ठेवणाऱ्या लेडी सिंघम यांच्या खास कार्यपद्धतीचे खासदार सुप्रिया सुळेकडून गोड कौतुक होत आहे. 

नाशिक : कोविड १९ या आजाराने चर्चेत असलेलं किंबहुना हॉटस्पॉट ठरून राज्याला विशेष लक्ष देण्यास भाग पाडणारं शहर म्हणजे मालेगाव. अनेक बाजुंनी संवेदनशील ठरणारा हा भाग. कोरोनाविरोधातील लढाईत स्वतःच्या विभागाचे ३ पोलीस शहीद झाले असतांना सुद्धा अनेक भावनिक करून टाकणाऱ्या प्रसंगांना तोंड देत 'हौसले बुलंद' ठेवणाऱ्या नाशिकच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या कार्यपद्धतीचे खासदार सुप्रिया सुळेकडून गोड कौतुक होत आहे. 

सुप्रिया सुळेकडून नाशिकच्या लेडी सिंघमचं गोड कौतुक
कोरोनाविरोधातील लढाईत नाशिक ग्रामीणचे आजपर्यंत ९४ पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी ८३ पोलिसांनी कोरोना चितपट करत कोरोनावर मात केली आहे तर ३ जण या लढाईत शहीद झाले आहेत. इतर ७ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. देशवासियांच्या सुरक्षेसाठी पोलीस शहीद होतात तेव्हा ही एका बाजूला अभिमानाची गोष्ट ठरत असली तरी कुटूंबिय व ज्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात अशा पोलीस सहकारी व अधिकाऱ्यांसाठी ही घटना अस्वस्थ करणारी ठरते. अशा प्रचंड ताण-तणावातही खाकी वर्दीतील सर्व योद्धे मात्र खंबीरपणे उभे आहेत याचं श्रेय अशा पोलिसांना आधार देणाऱ्या, वेळोवेळी त्यांचं मनोबल उंचावणाऱ्या आरती सिंह यांचचं.

Image may contain: 1 person, text

पोलीस अधीक्षक आरती सिंह चं काम भावलं

मागील महिन्यात मातृदिन आणि सिंह यांचा वाढदिवस एकाच दिवशी आला, अर्थातच गेल्या अनेक दिवसांपासून मालेगाव मध्ये तळ ठोकून बसणारी आपली आई आजतरी घरी येईल अशी लेकरांना अपेक्षा होती. मात्र मातृदिनादिवशी देखील आई-लेकरांमधील दुरावा कायम राहिला, शेवटी लेकरांनी व्हिडिओ कॉलिंग द्वारे मातृदिन व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे बघून ह्या लेडी सिंघम मधील 'आई' मात्र हळहळली.

हेही वाचा > भीतीदायक! दोघींना पकडून अंधारात खेचत नेले...भय इथले कधी संपणार?..

नाशिक ग्रामीण पोलिसांचे मनोबल उंचावले

या सर्व घडामोडीवर लक्ष ठेऊन असणाऱ्या सुप्रियाताई सुळे आरती सिंह यांच्या कामाने भारावल्याने त्यांनी ट्वीटर द्वारे ह्या लेडी सिंघमच मनभरून कौंतुक केलं आहे. यामुळे पोलीस अधीक्षक सिंह सोबतच नाशिक ग्रामीण पोलिसांचे मनोबल उंचावले आहे. या ट्विट ला आरती सिंह यांचं काम जवळून बघणारे मंत्री दादा भुसे यांनी देखील रिट्विट केलं आहे.

हेही वाचा > वाहनांची वर्दळ कमी..तरीही जाताएत इतके जीव? दुष्टचक्र कधी संपणार?

नाशिक ग्रामीण
९४ कोरोना बाधित
३ शहीद
८४ उपचारातून बरे
७ उपचार घेताय

एकूण बंदोबस्त मधील
१८२ बाधित
१५६ उपचारातून बरे
३ शहीद
२३ उपचार घेताय

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule gives compliments to dr.aarti singh nashik marathi news