कांदा व्यापाऱ्याची ६२ लाख रुपयांची फसवणूक; आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

मोठाभाऊ पगार
Monday, 28 December 2020

पोलिसांनी संशयितास पटणा न्यायालयात हजर केल्यानंतर देवळा पोलिसांनी १४ डिसेंबरला संशयितास पटना येथील त्याच्या घरी जाऊन ताब्यात घेतले व कंकडबाग पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती दिली.

 देवळा (जि.नाशिक) : उमराणे (ता. देवळा) येथील कांदा व्यापाऱ्याची ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शरदकुमार ऊर्फ तुनटून सिंग (रा. लोहियानगर, कंकडबाग, पटना, बिहार) या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती देवळा पोलिसांनी रविवारी (ता. २७) दिली. 

आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
याबाबत देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मंगेश निंबा आहेर (कांदा व्यापारी, रा. उमराणे, ता. देवळा) यांच्याकडून संशयित शरदकुमार ऊर्फ तुनटून सिंग याने वेळोवेळी विश्वास संपादन करत २०१७-१८ या कालावधीत कांदा खरेदी केला असून, त्याचे ६२ लाख ४९९ रुपयांची वेळोवेळी मागणी केली असता, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच समक्ष जाऊन देखील पैशांची मागणी केली असता, ‘तुझे पैसे देणे नाही, तुझे हातून जे होईल ते करून घे’, असे बोलून पैसे अदा केले नाहीत. 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

घरी जाऊन ताब्यात घेतले
याप्रकरणी आहेर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पटना पोलिसांनी संशयितास पटणा न्यायालयात हजर केल्यानंतर देवळा पोलिसांनी १४ डिसेंबरला संशयितास पटना येथील त्याच्या घरी जाऊन ताब्यात घेतले व कंकडबाग पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती दिली. न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी दिली.  

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspect arrested for Onion trader cheating nashik marathi news