PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

ठाण्यातील कळवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 27 डिसेंबर 2019 ला मध्यरात्री वीर युवराज मेडिकल स्टोअर्सचे शटर उचकटून संशयित अन्सारीने घरफोडीचा प्रयत्न केला होता. त्या वेळी मेडिकलमध्ये प्रेमसिंग किशोरसिंग राजपुरोहित (26) झोपलेला होता. शटरचा आवाज ऐकून प्रेमसिंग जागा झाला असता...

नाशिक : ठाण्यातील कळवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 27 डिसेंबर 2019 ला मध्यरात्री वीर युवराज मेडिकल स्टोअर्सचे शटर उचकटून संशयित अन्सारीने घरफोडीचा प्रयत्न केला होता. त्या वेळी मेडिकलमध्ये प्रेमसिंग किशोरसिंग राजपुरोहित (26) झोपलेला होता. शटरचा आवाज ऐकून प्रेमसिंग जागा झाला असता...

धक्कादायक..असा घडला प्रकार..

ठाण्यातील कळवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 27 डिसेंबर 2019 ला मध्यरात्री वीर युवराज मेडिकल स्टोअर्सचे शटर उचकटून संशयित अन्सारीने घरफोडीचा प्रयत्न केला होता. त्या वेळी मेडिकलमध्ये प्रेमसिंग किशोरसिंग राजपुरोहित (26) झोपलेला होता. शटरचा आवाज ऐकून प्रेमसिंग जागा झाला असता, संशयित अन्सारीने त्याच्याकडील पिस्तुलातून गोळी झाडून त्याचा खून केला. तसेच गल्ल्यातील आठ हजार 650 रुपये लंपास करून फरारी झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. घटनेनंतर ठाणे पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी करून संशयिताचा शोध सुरू केला.

Image may contain: one or more people and people standing

नाशिक पोलिसांची कामगिरी..

यादरम्यान नाशिक आयुक्तालयाच्या गुन्हेगारांच्या आदानप्रदान कार्यक्रमात ठाणे पोलिसांनी संशयिताचा फोटो दाखविला. त्यानुसार, शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती पथकाने शोधमोहीम राबविली. यात संशयितासोबत फिरणाऱ्या दोन महिलांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या या दोघींनी संशयित अन्सारीची माहिती दिली. त्यानुसार गुरुवारी (ता. 16) संशयित सर्फराज निलगिरी बाग परिसरात आला. पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली. त्याच्याकडून 20 हजार रुपयांचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, मालेगाव येथून चोरलेली 30 हजारांची दुचाकी, मोबाईल व रोकड असा एकूण 65 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्फराज अन्सारीविरोधात आडगाव पोलिसांत आर्म ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सर्फराज अन्सारी (वय 26, रा. रांची, झारखंड) असे संशयित आरोपीचे नाव असून, त्याने नाशिकसह मालेगाव, चांदवड, चाळीसगाव रोड या ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. 

क्लिक करा > PHOTO : धक्कादायक! यात्रेत चिमुरडी अचानक गायब...शोध घेतल्यावर धक्काच!

Image may contain: 3 people, people standing

हेही वाचा > VIDEO : ह्रदयद्रावक! पतंगामागे धावत होता चिमुकला...ऐन मकरसंक्रांतीलाच आक्रोश..

हेही वाचा > लॉटरी लागल्याचा आनंदच आनंद...अन् क्षणात दु:खाचा डोंगर...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspected in Thane murder case arrested by Nashik police Crime Marathi News