नाशिक रोड कारागृहातील अधिकाऱ्याचे निलंबन.. "कारागृह भ्रष्टाचाराचा अड्डा अन् एकाच अधिकार्‍यावर कारवाई?" चर्चांना उधाण

nashik jail.jpg
nashik jail.jpg

नाशिकरोड : उत्तर महाराष्ट्रातील ब्रिटिशकालीन कारागृह समजल्या जाणाऱ्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील एका अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई केवळ एकाच अधिकाऱ्यावर झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कारागृह म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा अन् एकाच अधिकार्‍यावर कारवाई ?

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह हे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे कारागृह समजले जाते. या कारागृहात स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी बलिदान दिलेल्या अनेक क्रांतिकारकांनी येथे बंड पुकारले आहे. श्यामची आई लिहिणारे साने गुरुजी कुसुमाग्रज यांचेही पाय-या कारागृहाला लागलेले आहेत. मात्र अलीकडे हे कारागृह म्हणजे भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा म्हणून संबोधले जाते आहे. या कारागृहातील अनेक अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले आहेत दोन दिवसापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी भेट दिल्यानंतर कारागृह अधिकारी संतोष कोकणे यांना काही संशयास्पद कृत्यामुळे निलंबित करण्यात आले आहे.

पोलिस महासंचालक रामानंद यांची कारवाई

कारागृह आतल्या 70 टक्के अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले असतानाच एकच अधिकार्‍यावर कारवाई का? असा सवाल सध्या कारागृह वर्तुळातून चर्चिला जात आहे.कोकणे या अधिकाऱ्याच्या निलंबनाच्या कारवाई झाल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी पसरले होते. या वृत्ताल कारागृहाच्या वरिष्ठ अधिका-यांनी दुजोरा दिला आहे. निलंबित केलेल्या अधिका-याने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पुणे येथील अप्पर पोलिस महासंचालक रामानंद यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. कोकणे यांच्याविरुध्द काही कैद्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. कोकणे यांनी सर्कल, कारखाना व कारागृहाच्या इतर विभागात काम पाहिले आहे. या कारवाईमुळे कारागृह वर्तुळात खळबळ उडाली असून इतर अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. कारागृहात असलेल्या कैद्यांच्या नातेवाईकांना मुलाखतीला बोलावणे, पाहिजे तितक्या वेळा नातेवाइकांना भेटू देणे, आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या व आर्थिक परिस्थिती वजनदार असणाऱ्या कैद्यांना व्हीआयपी सेवा पुरवणे कामी या कारागृहात अनेक आर्थिक घोटाळे होत असतात. यामध्ये अधिकाऱ्यांचे हात मोठ्याप्रमाणावर बरबटलेले असतात.

इतरही अधिकाऱ्यांच्या चौकशा व्हायला हव्यात

कारागृहाच्या बाहेर कारागृहातिल अधिकार्‍यांनी नेमलेले दलाल मुलाखतींना नातेवाईकांना घेऊन आर्थिक देवाण-घेवाण करतात. या घोटाळ्यांमध्ये अधिकारी मोठ्या प्रमाणावर पैसा वसूल करीत असतात. इतरही अधिकाऱ्यांच्या चौकशा व्हायला हव्यात अशी अपेक्षा कायद्यांचे नातेवाईक करीत असून अजूनही काही अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात काम करीत असून त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता कारागृह वर्तुळात व्यक्त केली जात आहे

..म्हणून कायदेशीर कारवाई

संतोष कोकणे यांच्यावर काही आरोप होते ते अद्याप सिद्ध झाले नाही. त्यांच्या कामात कसूर दिसून आला. त्यांच्या विरुद्ध तक्रारी होत्या, म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे-  दिलीप झळके  (डीआयजी, कारागृह विभाग)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com