स्वच्छ भारत अभियानाचा निकाल लांबणीवर..नाशिककरांच्या पदरी प्रतीक्षा कायम! 

nashik city 1.jpg
nashik city 1.jpg

नाशिक : स्वच्छ भारत अभियानात यंदा नाशिकचा पहिल्या दहा शहरांमध्ये क्रमांक येईल, अशी अपेक्षा होती. महापालिकेनेही त्यासाठी कसोशीने प्रयत्न केले असताना कोरोनामुळे मात्र नाशिककरांच्या पदरी निराशा पडली आहे. देशभरातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता स्पर्धेचा निकाल लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तसे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. 

कोरोनाचा परिणाम; नाशिककरांच्या पदरी प्रतीक्षा कायम 
पाच वर्षांपासून देशात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. दर वर्षी जानेवारीत स्वच्छ शहर स्पर्धा होते. केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेले पथक शहरात दाखल होऊन गुप्तपणे स्वच्छतेची पाहणी करते. त्यातून शहराचा गुणानुक्रम ठरविला जातो. केंद्र सरकारतर्फे मार्चमध्ये निकाल जाहीर होतो. गेल्या वर्षी दहा लाख लोकसंख्येच्या देशातील 500 शहरांमध्ये नाशिकचा 67 वा क्रमांक होता. त्यामुळे 2020 मध्ये पहिल्या दहा शहरांच्या यादीत क्रमांक मिळविण्यासाठी नाशिक महापालिकेने कसोशीने प्रयत्न केले होते. गेल्या वर्षी केंद्र सरकारकडून दर तीन महिन्यांनी एकदा सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.

पहिल्या सर्वेक्षणात नाशिकचा चौथा क्रमांक

पहिले सर्वेक्षण मार्च ते मे 2019 मध्ये झाले. पहिल्या सर्वेक्षणात नाशिकचा चौथा क्रमांक होता. जून ते ऑगस्ट 2019 मधील दुसऱ्या सर्वेक्षणात सातवा क्रमांक आला होता. तिसऱ्या तिमाही सर्वेक्षणासाठी महापालिकेने युद्धपातळीवर तयारी करताना नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महापालिकेच्या सर्वच अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली होती. जानेवारीत सर्वेक्षण पूर्ण झाले. मार्चअखेरीस निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र जगभर कोरोनाचे संकट कोसळले. त्यात भारतात 21 दिवसांचा "लॉकडाउन' जाहीर करण्यात आल्याने संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी मैदानात उतरली. त्यामुळे स्पर्धेचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. 

शासनाचे यासंदर्भातील पत्र महापालिकेला प्राप्त

कोरोनामुळे स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला असून, शासनाचे यासंदर्भातील पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. - डॉ. सुनील बुकाने, आरोग्याधिकारी, महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com