अंगावर काटा आणणारी घटना! भेदरलेल्या अवस्थेत चालक.. ताबा सुटून कार थांबली रेल्वे ट्रॅकवर.. समोरून रेल्वे..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

 ताबा सुटून कार थांबली रेल्वे ट्रॅकवर.. आत भेदरलेल्या अवस्थेत चालक.. समोरून रेल्वेचा भोंगा..नाशिकरोड येथून जवळच असलेल्या सौभाग्यनगर भागातील शनिमंदिरापासन रेल्वे ट्रॅककडे जाणा-या मार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने ही कार सरळ रेल्वे ट्रॅकवर जाऊन थांबली. त्यानंतर जे काही घडले ते अंगावर काटा आणणारे होते.

नाशिक : ताबा सुटून कार थांबली रेल्वे ट्रॅकवर.. आत भेदरलेल्या अवस्थेत चालक.. समोरून रेल्वेचा भोंगा..नाशिकरोड येथून जवळच असलेल्या सौभाग्यनगर भागातील शनिमंदिरापासन रेल्वे ट्रॅककडे जाणा-या मार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने ही कार सरळ रेल्वे ट्रॅकवर जाऊन थांबली. त्यानंतर जे काही घडले ते अंगावर काटा आणणारे होते.

नेमके काय घडले?

  नाशिकरोड येथून जवळच असलेल्या सौभाग्यनगर भागातील शनिमंदिरापासन रेल्वे ट्रॅककडे जाणा-या मार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने ही कार सरळ रेल्वे ट्रॅकवर जाऊन थांबली. भेदरलेल्या चालकाने गाडीतून उतरुन पळ काढल्याचे समजते. याचवेळी मुंबईकडून भुसावळकडे जात असलेली भुसावळ आरओएच हि गाडी वेगाने आली व ट्रॅकवर असलेल्या स्विफ्ट (एमएच ३१ सीपी ५६५५) हिला जोरदार धडक दिली.

Image may contain: car

धडक दिल्याने स्विफ्ट गाडी ट्रॅकच्या डाव्या बाजूला फेकली गेली असून तिचा चक्काचूर झाला आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरसिंग गुहलोत, राजपूत व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रेल्वेचे अभियंते अनिल कुमार, निराला यांनी पाहणी केली. रेल्वे सुरक्षा बलाने या घटनेचा पंचनामा केला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. चारचाकी उडवल्याची माहिती देवळाली रेल्वेस्थानकाशी संपर्क साधून मिळाली. रात्री उशिरा रेल्वेचे उच्च पदस्थ अधिकारी व विविध विभागाच्या तंत्रज्ञांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swift car on the rail hit the train nashik marathi news